ETV Bharat / state

मुंबईत गणेश विसर्जनाची तयारी जय्यत, बंदोबस्तासाठी ४० हजाराहून अधिक पोलीस तैनात - police protection

यंदा मुंबईतील 129 ठिकाणी गणपती विसर्जन होणार असून मुंबईत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ४० हजारांहुन अधिक पोलीस तैनात असणार आहे. तसेच जलतरणपटू, तटरक्षक दल व नौदलाची मदत घेऊन बोटी व लॅचेस उपलब्ध करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमनासाठी 53 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून 53 रस्त्यांवर एकदिशा (वन वे) मार्ग करण्यात आला आहे.

गणपती विसर्जन
author img

By

Published : Sep 11, 2019, 8:59 PM IST

Updated : Sep 11, 2019, 10:42 PM IST

मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती विसर्जनाची धूम असणार आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला गाजत वाजत निरोप देण्याकरिता भाविकांची तयारी जोरात सुरू आहे. तर, मुंबईत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनीही आपली कंबर कसली आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी मुंबईच्या रस्त्यावर तब्बल 40 हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहेत.

गणपती विसर्जनासाठी मुंबईत ४० हजाराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त

यंदा मुंबईतील 129 ठिकाणी गणपती विसर्जन होणार असून मुंबईच्या समुद्र किनारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलतरणपटू, तटरक्षक दल व नौदलाची मदत घेऊन बोटी व लॅचेस उपलब्ध करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमनासाठी 53 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून 53 रस्त्यांवर एकदिशा (वन वे) मार्ग करण्यात आला आहे. मुंबईतील 99 ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला असून 18 ठिकाणी रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हेही वाचा - मुंबईतील गणेश गौरव पुरस्कार जाहीर; माझगांवच्या ताराबाई गणेश मंडळाला प्रथम पारितोषिक

मुंबईतील सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता, स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रन पथक, जलद प्रतिसाद पथक, बीडीडीएस, मुंबई वाहतूक विभाग यांचा फौजफाटाही तयारीत असणार आहे.

या सोबतच होमगार्ड, आरएसपी, एनएसएस, एनसीसी, स्काऊट गाईड आणि विविध एनजीओची मदतही घेतली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी तसेच लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीत साध्या वेशातील पोलीस तैनात असणार आहेत. मुंबईतील रस्त्यावर 5000 अधिक सीसीटीवीच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन, जुहू चौपाटी आणि पवई येथील गणेश घाट अशा 5 ठिकाणी ट्राफिक पोलिसांकडून नियंत्रण कक्ष उभारण्यात आली आहेत.

हेही वाचा - मुंबईत गणेशोत्सवात विद्यार्थ्यांकडून पर्यावरण रक्षणासाठी पथनाट्यातून जागृती

Intro:आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी अनंत चतुर्दशी दिवशी सण साजरा होणार असून , मुंबईत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी मुंबईच्या रस्त्यावर तब्बल 40 हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार असून मुंबईतील सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता , स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त , सशस्त्र दल , राज्य राखीव पोलीस बल , दंगल नियंत्रन पथक , जलद प्रतिसाद पथक , बी डी डी एस , मुंबई वाहतूक विभाग यांचा फौजफाटा असणार आहे.

Body:या बरोबरच होमगार्ड , आरएसपी , एनएसएस , एनसीसीन, स्काऊट गाईड , व विविध एनजीओ ची मदत घेतली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी व लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीत सध्या वेशातील पोलीस असणार असून मुंबईतील रस्त्यावर 5000 अधिक सीसीटीवी च्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी , शिवाजी पार्क चौपाटी , मालाड मालवणी टि जंक्शन , जुहू चौपाटी , व पवई येथील गणेश घाट अशा पाच ठिकाणी ट्राफिक पोलिसांकडून नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे.

Conclusion:यंदा मुंबईतील 129 ठिकाणी गणपती विसर्जन होणार असून मुंबईच्या समुद्र किनारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलतरणपटू , तटरक्षक दल व नौदलाची मदत घेऊन बोटी व लॉचेस उपलब्ध करण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमनासाठी 53 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून 53 रस्त्यांवर एकदिशा ( वन वे) मार्ग करण्यात आला आहे. मुंबईतील 99 ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आली असून 18 ठिकाणी रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

( बाईट मराठी व हिंदी - प्रणय अशोक , डीसीपी मुंबई पोलीस , 10 सप्टेंबर रोजी गिरगाव चौपाटी येथून सुरक्षेचा wkt , लाइव्ह यु 3 g नंबर 7 ने पाठवला आहे . कृपया बातमीला तो वापरावा.)
Last Updated : Sep 11, 2019, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.