मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना व्हॉट्सअॅपवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने आमदार अबू आझमींना व्हॉट्सअप मेसेज करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अबू आझमी यांनी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबू आझमी यांनी ट्विट करुन या गृहस्थाने माझ्या वैयक्तिक फोन नंबरवर कॉल आणि व्हॉट्सअपद्वारे मला 3 दिवसात मारण्याची धमकी दिल्याचे स्पष्ट केले आहे.
3 दिवसात करणार टार्गेट पूर्ण : आमदार अबू आझमी यांनी याबाबत ट्विट करुन या गृहस्थाने मला माझ्या वैयक्तिक फोन नंबरवर कॉल केला आहे आणि मला 3 दिवसांचे टार्गेट देऊन व्हॉट्सअॅपद्वारे मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणाची कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. असे ट्विट आमदार अबू आझमी यांनी केले आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि मुंबई पोलिसांनी दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचे आवाहन आमदार अबू आझमी यांनी केले आहे.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी व्हॉट्सअॅपवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याची तक्रार केली आहे. आमदार अबू आझमींच्या तक्रारीवरुन मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली आहे.
औरंगजेबाच्या समर्थनार्थ केले होते वक्तव्य : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख अबू असीम आझमी यांना औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यामुळे जानेवारी महिन्यातही अबू आझमी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन कॉलरने कॉलवर शिवीगाळ केली आणि अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणीही त्यांनी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ईद उल अजहासाठी अबू आझमी यांनी केली ही मागणी : समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ईद-उल-अजहा नमाज अदा करण्यासाठी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे परवानगी मागितली आहे. याशिवाय पोलीस आणि महापालिका मुंबईबाहेरून जनावरे घेऊन जाणारी वाहने थांबवून व्यापारी व शेतकऱ्यांना त्रास देत असल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. आझमी म्हणाले की त्यांनी या प्रकरणांवर भारती यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांनी संबंधित पोलीस अधिकार्यांना या समस्येचे निराकरण करण्याचे आणि होणारी गैरसोय थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा -