ETV Bharat / state

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर - University of Science

विद्यार्थ्यांनी अनावश्यक प्रवास टाळून आपल्या सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, वसतिगृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय महाविद्यालय वसतिगृहात येऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Maharashtra University of Health Sciences
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
author img

By

Published : Jun 6, 2020, 8:29 PM IST

मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्रातील लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 15 जुलै 2020 पासून घेण्यात येणार आहेत. याबाबत परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी माहिती दिली आहे.

यावेळी पाठक म्हणाले, केंद्रीय परिषदांनी दिलेल्या निर्देशान्वये आणि विद्यापीठ परीक्षा मंडळाच्या ठरावान्वये सन 2020 मधील उन्हाळी सत्रातील लेखी व प्रात्यक्षिक अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षार्थी विद्यार्थी व संलग्नित महाविद्यालयाच्या सोईसाठी सदर परीक्षा या टप्प्याटप्प्याने व विद्यार्थी ज्या ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत, त्या महाविद्यालयातच परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. वेळापत्रकात नमुद लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना स्थानिक गावानजीकच्या त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा केंद्रावर त्या ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध असल्यास लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा केंद्र बदली देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी अनावश्यक प्रवास टाळून आपल्या सध्याच्या सोयीच्या वास्तव्याच्या ठिकाणीच शांतपणे परीक्षेची तयारी करावी. बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय, वसतिगृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय महाविद्यालय वसतिगृहात येऊ नये. शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. परीक्षासंदर्भात आवश्यक सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी इतर माध्यमातून येणाऱ्या सूचना व बातम्यांवर विश्वास ठेवू नये. परीक्षार्थींच्या शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठातर्फे सुरु करण्यात हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. विद्यापीठाच्या उन्हाळी-2020 सत्रातील परीक्षा या टप्प्या-टप्प्याने घेण्यात येणार आहेत. पदवी व पदव्युत्तर परीक्षा टप्प्या-टप्प्याने घेण्यात येतील, यातून कोणत्याही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सुट देण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यापीठ परीक्षा संबंधी अधिक माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यांगत यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वरील माहिती अधिकृत समजण्यात यावी, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.