ETV Bharat / state

कोरोनाने मृत्यू झाल्यास विद्यार्थ्यांना ३ लाखांची मदत; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा परीक्षा घेण्यासाठी अट्टहास कायम  - maharashtra university of health sciences mumbai news

विद्यापीठाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना 'कोविड सुरक्षा कवच' योजनेअंतर्गत, विद्यार्थी आजारी झाल्यास उपचारासाठी १ लाख व मृत्यू झाल्यास ३ लाख रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून आज सांगण्यात आले. 

कोरोनाने मृत्यू झाल्यास विद्यार्थ्यांना ३ लाखांची मदत

author img

By

Published : Jul 13, 2020, 7:31 PM IST

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भात लक्षात घेऊन पारंपारिक विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागात आटोकाट प्रयत्न करत असतानाच आरोग्य विज्ञान विद्यापीठाने मात्र, या परीक्षा घेण्याचा चंग बांधला आहे. यासाठी त्यांनी आज(सोमवार) विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली तर उपचारासाठी खर्च म्हणून १ लाख आणि एखाद्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ३ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही हे कोविड कवच देत असल्याचा दावाही विद्यापीठाने केला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे आज यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना 'कोविड सुरक्षा कवच' योजनेअंतर्गत, विद्यार्थी आजारी झाल्यास उपचारासाठी १ लाख व मृत्यू झाल्यास ३ लाख रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून आज सांगण्यात आले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सत्रातील 2020 परीक्षेकरता वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना 'कोविड सुरक्षा कवच योजना' लागू करण्यात आली असून त्याला आज व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने मंजुरी दिली आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी याबाबत सांगितले, कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीत एकवेळची विशेष बाब म्हणून पदवीपूर्व विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे विद्यार्थी हे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळचे, त्यांच्या अभ्यासक्रमाचे महाविद्यालय हे परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात. किंवा सद्यस्थितीत ते ज्या महाविद्यालयात प्रवेशित आहेत ते महाविद्यालयदेखील ते परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात. ज्या परीक्षा केंद्राची ते निवड करतील तेथूनच त्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी हजर राहावे लागेल. पदवीपूर्व सर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे आवाहन करण्यात येते की, कोरोनामुळे उद्भवलेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास करु नये या उद्देशाने त्यांनी त्यांच्या घराजवळच्या त्यांच्या विद्याशाखेच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा.

सदर पसंतीक्रम त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांमापर्फत विद्यापीठास 14 जुलै 2020 पर्यंत पाठवावा. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कोरोनाकरता शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.