ETV Bharat / state

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन तूर्तास स्थगित: उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार न्युज

अनेक दिवसांपासुन प्रलंबित असलेली सातव्या वेतन आयोगाची मागणी तसेच इतर मागण्यांसाठी 14 विद्यापीठांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कर्मचार्‍यांच्या कृती समितीची बैठक पार पडली. दरम्यान, सातव्या वेतन आयोगासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याने हे आंदोलन मागे घेण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन तूर्तास मागे

author img

By

Published : Oct 1, 2020, 5:16 PM IST

मुंबई - राज्यातील 14 विद्यापीठांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासोबतच इतर मागण्यांसाठी सुरू केलेले लेखणीबंद आंदोलन मागे घेण्याचा आज निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर अधिकारी-कर्मचार्‍यांच्या कृती समितीने तूर्तास आपले हे लेखणीबंद आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. यामुळे आता राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील विद्यापीठांमध्ये आजपासून अंतिम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, मागील तीन दिवसांपासून विद्यापीठ कर्मचारी संघटनांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा परीक्षांवर परिणाम झाला होता. यामुळेच राज्यातील चारहून अधिक विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात कर्मचारी-अधिकारी संघाच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत सातव्या वेतन आयोगासंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याने हे आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे.

दरम्यान, सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली होती. मात्र चर्चेनंतरही कृती समितीचे समाधान झाले नव्हते. त्यामुळे हे लेखणी बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात आले होते. राज्यातील सुमारे १४ विद्यापीठातील तब्बल १७ हजाराहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. या संदर्भात आज उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून सायंकाळपर्यंत विद्यापीठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सरकारकडून जीआर काढला जाणार असल्याची माहिती कृती समितीचे दीपक वसावे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.