मुंबई - मुंबईत कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक झोपडपट्टी भागात वैद्यकीय सुविधा पोहोचायला अनेक अडचणी येतात. मात्र, आता रिक्षामध्ये रुग्ण वाहतुकीसाठी सोय केली जाणार आहे. यामुळे झोपडपट्टी भागातील रुग्णांना सेवा देणे सोयीचे होणार आहे. याबाबत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एक व्हिडिओ आपल्या ट्विटर खात्यावरुन शेअर केला आहे.
-
Handing over these unique auto rickshaws to @mybmc shortly.
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) July 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The retrofitted 🛺 will visit Mumbai’s sprawling slums to dispense oxygen & conduct #COVID19 tests.
Supported by @GodrejGroup & designed by @Anantuniv, I hope the mobile units will help decongest city hospitals 🙏🏼 pic.twitter.com/oxgqMwwazS
">Handing over these unique auto rickshaws to @mybmc shortly.
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) July 5, 2020
The retrofitted 🛺 will visit Mumbai’s sprawling slums to dispense oxygen & conduct #COVID19 tests.
Supported by @GodrejGroup & designed by @Anantuniv, I hope the mobile units will help decongest city hospitals 🙏🏼 pic.twitter.com/oxgqMwwazSHanding over these unique auto rickshaws to @mybmc shortly.
— Milind Deora मिलिंद देवरा (@milinddeora) July 5, 2020
The retrofitted 🛺 will visit Mumbai’s sprawling slums to dispense oxygen & conduct #COVID19 tests.
Supported by @GodrejGroup & designed by @Anantuniv, I hope the mobile units will help decongest city hospitals 🙏🏼 pic.twitter.com/oxgqMwwazS
ही रिक्षा खास झोपडपट्टी भाग व लहान रस्त्यांचा विचार करून तयार करण्यात येत आहे. या रिक्षामध्ये रुग्णासाठी खाट, आरोग्य कर्मचाऱ्याला बसण्यासाठी जागा व ऑक्सीजनची सोय असणार आहे. त्याचबरोबर स्वयंचलित सॅनिटायझर स्प्रे, प्रथमोपचार पेटी, जनरेटरची सोय करण्यात आली आहे. ही रिक्षा लवकरच बृहन्मुंबई महापालिकेच्य ताब्यात देण्यात येणार आहे.
ही रिक्षा मुरली देवरा फाउंडेशनच्या माध्यामातून तयार होत असलेल्या या रिक्षासाठी मिलिंद देवरा यांनी गोदरेज व अनंत राष्ट्रीय विद्यापीठाचे आभार मानले आहे.
हेही वाचा - मुंबईत सोमवारी 1201 कोरोनाबाधित रुग्णांची भर, 1269 रुग्ण कोरोनामुक्त, तर 39 मृत्यू