मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची मुलगी गीता गवळी विधानसभा निवडणूक लढवत आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या नावे एक कोटी 20 लाख तर पतीच्या नावे 82 लाख अशी एकूण 2 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे.
मुंबईच्या भायखळा विधानसभा मतदार संघातून गीता गवळी निवडणूक लढवत आहे. मंगळवारी गवळींनी उमेदवारी अर्ज भरला. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण एक कोटी 20 लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असल्याचे म्हटले आहे. पती-पत्नीच्या नावे प्रत्येकी 10 लाखांचे असे एकूण 20 लाखांचे कर्ज आहे.
हेही वाचा - वडिलांसाठी मुलाचा त्याग, संदीप नाईक यांनी गणेश नाईकांसाठी सोडला मतदारसंघ
गीता व त्यांचे पती दोघांकडे 4 लाख रुपयांची रोख रक्कम आहे. गीता यांच्याकडे 750 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 22 लाख 50 हजार रुपये तर त्यांच्या पतींकडे 10 लाख 50 हजार रुपये किमतीचे 350 ग्रॅम सोने आहे. गवळींच्या नावे विविध ठिकाणी 27 लाख रुपये तर त्यांच्या पतीच्या नावे 54 लाखांचे फिक्स डिपॉझिट आहे.