ETV Bharat / state

हिंदुत्वाच्या मुद्यावर सेना आक्रमक, खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत जाऊन रामलल्लाच दर्शन घेणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यांवर पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झाली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्यावर सेना आक्रमक, खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर
author img

By

Published : Jun 6, 2019, 8:11 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने अयोध्या मिशन-2 हाती घेतले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत जाऊन रामलल्लाच दर्शन घेणार आहेत. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यांवर पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक झाली आहे. त्याबरोबरच आगामी काळात राम मंदिर प्रश्न तडीस लावण्यासाठी शिवसेनेची दबावाची भूमिका पाहायला मिळणार आहे.

हिंदुत्वाच्या मुद्यावर सेना आक्रमक, खासदारांसह उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातील अंबाबाईच दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे व नवनिर्वाचित 18 खासदार रामल्लाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जात आहेत. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा लक्षात असल्यामुळे आम्ही अयोध्येला जात असल्याचे आमदार मनीषा कायंदे यांनी सांगितले. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली.

शिवसेनेने भाजपशी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर युती केली आहे. त्यामुळे येत्या 5 वर्षांत राम मंदिराचा मुद्दा पूर्ण व्हायला पाहिजे. त्यासाठी शिवसेनेचे 18 खासदार लोकसभेत हा प्रश्न वेळोवेळी लावून धरतील व सरकारकडे याबाबत पाठपुरावा, असेही कायंदे यांनी यावेळी सांगितले.

Intro:लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्या मिशन 2 शिवसेनेने हाती घेतल आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 18 नवनिर्वाचित खासदार पुन्हा अयोध्येत जाऊन रामलल्लाच दर्शन घेणार आहेत. हिंदुत्ववादाच्या मुद्यांवर पुन्हा शिवसेना आक्रमक झाली आहे. राम मंदिराचा प्रश्न तडीस लावण्यासाठी शिवसेना तडजोड करणार नाही. आगामी काळात राम मंदिर प्रश्न तडीस लावण्यासाठी शिवसेनेची दबावाची भूमिका पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

Body:शिवसेनेला लोकसभेत अपेक्षित यश मिळाल्यामुळे प्रथम एकविरा देवीचं दर्शन घेऊन आज कोल्हापूरला अंबाबाईच दर्शन घेतलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नवनिर्वाचित खासदार हे रामल्लाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जात आहेत. हा मुद्दा आमच्या लक्षात आहे हे लोकांना दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे व नवनिर्वाचित खासदार अयोध्येला जातील असे शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी सांगितले.
शिवसेनेने भाजपशी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर युती केली. यामुळे येत्या 5 वर्षांत हा मुद्दा पूर्ण व्हायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

Conclusion:शिवसेनेचे 18 खासदार लोकसभेत राम मंदिर प्रश्न वेळोवेळी लावून धरतील व सरकारकडे याबाबत पाठपुरावा करतील असे मनीषा कायंदे यांनी म्हटले.
भाजपकडे इन्कमिंग मोहीम सुरू असली तरी महाराष्ट्रात व्यवस्थितपणे युतीचा फॉर्म्युला ठरल्याप्रमाणे होईल, हे आजच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, त्यामुळे राज्यात युती पुन्हा पाहायला मिळेल असेही त्या म्हणाल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.