ETV Bharat / state

ठाकरे गटावर मात करण्याकरिता शिंदे गटानं 'ही' केली नवी युक्ती, ठाण्यात पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता - शिवसेना शाखा इतिहास काय आहे

Shiv Sena shakha : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शाखांवरून होणारे वाद टाळण्यासाठी ठाण्यात कंटेनर शाखांचा पर्याय समोर आलायं. मुंब्र्यातील वादग्रस्त मध्यवर्ती शाखेचं पाडकाम केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात कंटेनरमध्ये शाखा थाटण्यात आली असतानाच ठाण्याच्या शिवाईनगर येथेही चक्क पदपथावरच शाखा सुरू करण्यात आलीय. त्यामुळं ठाण्यातही ‘कंटेनर शाखां’वरून वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Shinde group vs Thackeray group
शिवसेना शाखांना आता 'कंटेनर शाखांचा पर्याय', ठाण्यात वाद पेटण्याची शक्यता
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 8:01 AM IST

Updated : Nov 24, 2023, 9:20 AM IST

शिंदे गट, कंटेनर शाखा, ठाणे

ठाणे Shiv Sena shakha : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडल्यानंतर तिथे कंटेनर शाखा उभारून एक नवीनच पायंडा घालून देण्यात आलाय. ठाण्यातील शिवाईनगर येथे चक्क पदपथावरच अशी एक शाखा सुरू झाल्याने या कंटेनर शाखा दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वादाचे मूळ ठरू शकतात.

शिवसेनेचा इतिहास हा शाखांपासून सुरू झालेला आहे. बाळासाहेबांची शाखा ते उद्धव ठाकरेंची कॉर्पोरेट शाखा आणि आता एकनाथ शिंदे गटाची ताबा घेण्यापासून रोखण्याची कंटेनरवाली शाखा असा इतिहास या शाखांना पाहावा लागलाय. मुंब्रा येथील वादग्रस्त शाखा पाडल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील तोडलेल्या शाखेकडं जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना तसं करण्यापासून मज्जाव केला होता. त्यातच एकनाथ शिंदे गटाचे नेते राजन किडे यांनी शाखेची पुनर्बांधणी होईपर्यंत कंटेनर शाखा रस्त्याच्या कडेला सुरू केल्यानं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले होते.

Shinde Group, Container Shakha, Thane
शिंदे गट, कंटेनर शाखा, ठाणे

वाद पेटणार? : ठाणे महानगरपालिकेने कंटेनर शाखेवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे पाहून आता अशीच एक कंटेनर शाखा सध्या शिवाईनगर येथील टिएमटी बस थांबा शेजारीच उभारण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नऊ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. चक्क पदपथावरच उभारण्यात आलेल्या या आठ फूट रुंद व 14 फूट लांबीच्या कंटेनर शाखेचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्यानं ठाकरे गटानं विरोध केला आहे. कंटेनरमध्ये शाखा सुरू करण्याचा हा काही पहिलाच प्रकार नसून कळवा येथील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवर देखील पालिका प्रशासनानं कारवाई केली होती. त्यावेळी सदर ठिकाणी कंटेनरमध्ये शाखा सुरू करण्यात आली होती.

...म्हणूनच कंटेनर शाखा उभारण्यात आली : दरम्यान, गरज असेल तेथे अशा प्रकारच्या कंटेनर शाखा पुरवण्यात येतील असं शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख निरंजन शिंदे यांनी सांगितलयं. शिवाईनगर येथील शाखा आमदार प्रताप सरनाईक यांनी बांधली आहे. ती शाखा नव्यानं बांधण्यात येणार असल्याकारणानं तात्पुरत्या स्वरूपात कंटेनर शाखा उघडण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. नागरिकांच्या तक्रारीचं निवारण हे शिवसेना शाखांच्या माध्यमातून केलं जाते. त्यामध्ये खंड पडू नये म्हणूनच ही कंटेनर शाखा उभारण्यात आल्याचा त्यांनी दावा केला.

शिवाईनगर येथील सदरची शिवसेना शाखा ही 30 वर्षे जुनी आहे. शिंदे गटानं वाद उखडून काढल्यानंतर पोलिसांनी 6 मार्च 2023 रोजी त्याला टाळे ठोकले होते. तरी आता शिंदे गटानं नवीन खेळी खेळत ही कंटेनर शाखा सुरू केली. आपण याबाबत मूळ शाखेचे टाळे काढण्यासाठी वर्तकनगर पोलिसांना निवेदन दिले असल्याचं यांनी सांगितलं. तसंच आमच्या मागणीला विरोध झाल्यास उग्र आंदोलन करणार आहोत-स्थानिक माजी नगरसेवक भास्कर बैरीशेट्टी

शाखांपासून सत्तेपर्यंतचा मार्ग : 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर महाराष्ट्रभर हजारो शिवसेना शाखा सुरू झाल्या. शिवसेनेच्या शाखांमध्ये सामान्य जनतेला मिळत असलेला न्याय पाहून या शाखांविषयी नागरिकांमध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला. शिवसेनेला जनमानसात रुजवण्यात या शिवसेना शाखांचा फार मोठा वाटा होता, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शाखांनी संपादन केलेलं या सामान्य माणसाच्या विश्वासाचं रूपांतर शिवसेनेचे सत्तेत येण्यानं झालं एवढं मात्र निश्चित. शिवसेना शाखांचे असलेलं हे महत्त्व जाणल्यानेच त्यावर आपला हक्क गाजवण्यासाठी दोन्ही गटाकडून एवढे प्रयत्न केले जात आहेत. शाखांवरून होत असलेले हे निरंतर वाद टाळण्यासाठी दोन्ही गटांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut News : '31 डिसेंबरनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार', मुंब्रा शाखेवरून संजय राऊतांचा इशारा
  2. Shiv Sena shakha : मुंबईतून शिवसेना का संपत नाही, जाणून घेण्यासाठी वाचा 'हा' विशेष रिपोर्ट
  3. Shiv Sena Shakha demolition Case : महापालिका अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण; ठाकरे गटाच्या 4 कार्यकर्त्यांना 11 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Last Updated : Nov 24, 2023, 9:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.