ETV Bharat / state

Uddhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची मोर्चेबांधणी; बैठकीतून माजी आमदारांची चप्पल गायब - Thackeray group chief Uddhav Thackeray

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 9 तारखेपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या नेत्यांवर काय परिणाम होणार? याचाही आढावा ठाकरे यांनी घेतला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
author img

By

Published : Jul 5, 2023, 8:48 PM IST

मुंबई : राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीसाठी खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत हे देखील उपस्थित होते. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीत 2024 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्याची चर्चा झाली.

निवडणुकीची तयारी : शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीला त्यांच्या गटाचे खासदार, आमदार आणि उपनेते उपस्थित होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या नेत्यांवर काय परिणाम होणार? या संदर्भात चर्चाही झाली होती. मात्र, महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणीस उद्धव ठाकरे गटाने सुरुवात केली आहे.

288 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत, यात काही शंका नाही. शिवसेनेच्या मदतीशिवाय महाविकास आघाडी कोणतीही जागा लढवणार नाही, तशी भक्कम मोर्चेबांधणी करण्यात आली. - अंबादास दानवे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

पराभूत उमेदवारांशी चर्चा : ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार आणि निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराची बैठक घेतली आहे. कारण त्यानंतरच्या काळात विद्यमान आमदारांसोबत निवडणूक लढवणाऱ्यांचा काही उमेदवारांचा अल्प फरकाने पराभव झाला होता. त्यांना मोठा जनाधार आहे. काहींनी पक्षात प्रवेश करून संघटनात्मक, राजकीय पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा असो की विधानसभेच्या निवडणुका, काल जसे आपण विद्यमान आमदारांशी चर्चा केली, तशीच आज माजी आमदार आणि पराभूत उमेदवारांशी चर्चा केली आहे.

भक्कम मोर्चेबांधणी : येणाऱ्या काळात संघटना म्हणून आपण 48 लोकसभा मतदार संघ आणि 288 विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत, यात काही शंका नाही. शिवसेनेच्या मदतीशिवाय महाविकास आघाडी कोणतीही जागा लढवणार नाही, तशी भक्कम मोर्चेबांधणी करण्यात आली. शिवसेनेची मदत घेतलीच पाहिजे इतकी ताकद आपली सुद्धा असली पाहिजे. या अनुषंगाने बैठका पार पडल्या असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. तसेच 9 आणि 10 जुलैला यवतमाळ, वाशिम, अमरावती आणि नागपूर अशा पद्धतीने दौऱ्याला सुरुवात होईल. 13 आणि 14 जुलैला मराठवाड्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे दौरा होणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

माजी आमदार संजय कदम यांची पादत्राणे गायब : दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे देखील मातोश्रीवर आज बैठकीसाठी उपस्थित राहिले होते. मात्र बैठक संपल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांची पादत्राणे नसल्याचे आढळून आले. पादत्राणे गायब झाल्यामुळे अनवाणी चालत संजय कदम मातोश्री बाहेर आले. त्यानंतर ते स्वतःच्या गाडीत बसून निघून गेले. मात्र मातोश्रीवरून पादत्राणे गायब झाल्याची खंत त्यांना वाटत होती. दरम्यान, मातोश्रीवर आज माजी आमदार विनोद घोसाळकर, रामकृष्ण मढवी, भाऊसाहेब कांबळे, शरद पाटील, दिनकर माने,अशोक धात्रक, राजाभाऊ वाझे, जयप्रकाश मुंदडा, विषधरम जितेंद्र देवरे, तुकाराम काते, गौतम चाबुकस्वार, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, संजय कदम, विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत उपस्थित होते.

हेही वाचा - Ajit Pawar Meeting : अध्यक्षपदावर राहायचे होते तर राजीनामा का दिला? अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.