मुंबई - मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवतीर्थावर तयारी सुरू राज्यात एक वेगळ्याच समीकरणा अंतर्गत सत्ता स्थापन होत आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन होत आहे. महाविकासआघाडीचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. उद्या (28 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर शपथविधी होणार आहे.
हेही वाचा - मी पवारांना भेटलो ही मीडियाची बातमी, विरोधात होतो आताही विरोधात बसणार - शिवेंद्रराजे भोसले
शिवसेनेने पहिल्या दिवसापासूनच आपला मुख्यमंत्री झाला तर शपथविधी हा शिवाजी पार्क येथे होईल असे सांगितले होते त्यानुसार शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येत सरकार स्थापन होणार आहे. शपथविधीसाठी महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक मोठे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे याठिकाणी पालिका व महाराष्ट्र राज्य पोलीस प्रशासनाकडून मोठी व्यवस्था करण्यात येत आहे. उद्या शपथविधीसाठी देशभरातील शिवसैनिक आणि राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते देखील शिवाजीपार्क येथे उपस्थित राहणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आसन व्यवस्था, पाणी, शौचालय पार्किंग व्यवस्था सर्वांना हा शपथविधी कार्यक्रम पाहता यावा यासाठी मोठ्या एलईडी लाइट्स मोठे मंडप तसेच सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आल्याचे पालिका व पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शिवाजी पार्क येथून शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या शिवसैनिकांना संबोधित करत होते. आता त्याच ठिकाणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
हेही वाचा - अघोरी प्रयत्न करून सुद्धा भाजपला मुख्यमंत्री लादता आला नाही - संजय राऊत