ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंनी सरकारचे नेतृत्व करावे; महाविकासआघाडीच्या बैठकीत सहमती, पवारांची माहिती

उद्याही(शनिवार) आमच्या बैठका सुरूच राहतील. तसेच किमान समान कार्यक्रमावर अजून सविस्तर चर्चा झाली नसून ती लवकरच होईल, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

author img

By

Published : Nov 22, 2019, 9:07 PM IST

शरद पवार यांची प्रतिक्रिया

मुंबई - सरकारचे नेतृत्व कोणाकडे असेल या विषयावर आमच्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांमध्ये सहमती झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारचे नेतृत्व करावे यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती शरद पवार यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर दिली.

शरद पवार यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - 'शिवसेनेसोबतची चर्चा सकारात्मक; उद्याही बैठका राहणार सुरुच'

उद्याही(शनिवार) आमच्या बैठका सुरूच राहतील. तसेच किमान समान कार्यक्रमावर अजून सविस्तर चर्चा झाली नसून ती लवकरच होईल, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - अगोदर महा 'शिव' आघाडी..आता महा 'विकास' आघाडी...

दरम्यान, दिल्लीतल्या बैठका संपल्यानंतर आज आघाडीचे सर्व नेते मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर गुरुवारी रात्रीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक झाली होती. त्यानंतर आजच सायंकाळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली आहे. यावेळी शिवसेनेसह आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.