ETV Bharat / state

कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण करण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - narendra singh tomar news

महाराष्ट्रात पिकेल ते विकेल याधर्तीवर शेती क्षेत्रात काम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यां समवेत झालेल्या बैठकीत दिली. कृषी क्षेत्रात संशोधनासाठी संस्था निर्माण झाल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. पीकविमा याेजनेत राज्यांचा सहभाग 50 टक्के करावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Aug 27, 2020, 6:43 PM IST

मुंबई- भारताची ओळख कृषीप्रधान देश अशी आहे. शेती ही आपली संपत्ती असून तिचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे. शेतकऱ्याला सन्मान देतानाच कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात पिकेल ते विकेल या धर्तीवर शेती क्षेत्रात काम सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिली.

केंद्र शासनाने शेती क्षेत्रामध्ये हाती घेतलेल्या सुधारणांबाबत आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यातील मुख्यमंत्री, कृषीमंत्री यांच्याशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे त्यामध्ये सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.

शेती क्षेत्राच्या सुधारणेसाठी केंद्र शासनाने आणलेल्या नवीन अध्यादेशाचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शेती आणि शेतकरी आपली संपत्ती आहे. कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या माध्यमातून शेतकरी कल्याणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी राज्याचा हिस्सा पूर्वीप्रमाणे ५० टक्के करावा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी राज्याचा हिस्सा पूर्वीप्रमाणे ५० टक्के करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. विमा कंपन्यांची जिल्हास्तरावर कार्यालये असावीत जेणेकरुन शेतकऱ्याला विमा प्रतिनीधीशी संपर्क साधता येईल. बँकांकडून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा होण्यासाठी केंद्र शासनाने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

हेही वाचा-'कोरोना लस वितरणासंदर्भात केंद्र सरकारचा हलगर्जीपणा चिंताजनक'

कडधान्य आणि डाळींच्या खरेदीसाठीची २५ टक्क्यांच्या मर्यादेची अट रद्द करावी

बाजारपेठेचे सर्वेक्षण करून ज्या मालाला बाजारपेठ आहे त्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी पिकेल ते विकेल या धोरणानुसार राज्यात काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात कृषी विद्यापीठे आहेत मात्र कृषीआधारीत संशोधनासाठी संस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाफेड मार्फत कडधान्य आणि डाळींच्या खरेदीसाठीची २५ टक्क्यांच्या मर्यादेची अट रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी १ टक्का व्याजदराने कर्ज द्यावे- कृषीमंत्री भुसे

कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि शेतकरी गटांना १ टक्का व्याज दराने कर्ज देण्याची मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केली. राज्य शासनाने फळपीक विम्याचा सुधारीत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे. त्याला मान्यता देण्यात यावी, अशी मागणीही भुसे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.