मुंबई Uddhav Thackeray On Maratha Reservation : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत चिघळला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पाणी घ्यावं आणि उपोषणं सोडावं. आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी तसंच मराठा आंदोलकांनी कुठेही जाळपोळ करू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषदेत केलं आहे. मराठा समाजाने शांतता बाळगणं गरजेचं आहे. जर कोणी आंदोलकांना भडकवत असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी, यामागे कोणाचे कारस्थान आहे का? हे पाहायला पाहिजे असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सरकारने मार्ग काढावा : मराठा आंदोलकांचा आक्रोश लक्षात घेऊन राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्न ताबडतोब मार्गी काढला पाहिजे. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ताबडतोब पावले उचलावी आम्ही सरकारसोबत आहोत, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.
खासदारांनी केंद्रावर दबाव आणावा : केंद्र सरकारमध्ये असलेल्या राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याबाबत ठाम भूमिका घ्यावी. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हेच आरक्षण प्रश्नावर भूमिका घेऊ शकतात. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रावर दबाव आणावा. प्रसंगी सर्व खासदारांनी या प्रश्नावर राजीनामे द्यायला हवेत असं आवाहन ठाकरे यांनी केलं आहे.
गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी राजीनामे : राज्यातील काही आमदार मराठा आरक्षण प्रश्नी राजीनामे देत आहेत. मात्र त्यांच्यावर असलेला गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी केवळ हा त्यांचा खटाटोप असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. तसंच राज्य सरकारचं 'शासन आपल्या दारी' म्हणजे केवळ थोतांड असल्याचंही त्यांनी म्हटंलय.
हेही वाचा -
- CM talk to jarange patil on phone call : मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन जरांगे पाटीलांशी साधला संवाद; २० मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय?
- Maratha Reservation Protest : बीडमध्ये संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंदचा दुसरा दिवस, हिंसाचार प्रकरणी 49 जणांना अटक
- All Party Leaders Meeting : आंदोलकांच्या संतापानंतर मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची गोपनीय ठिकाणी बैठक, काय घेणार निर्णय