ETV Bharat / state

राज्याने ठरवावे खरे बोलणारे हवेत की खोटे बोलणारे? - उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी अमित शाहांसोबत समसमान वाटपाची चर्चा झाली होती, असे सांगितले.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 8, 2019, 6:29 PM IST

Updated : Nov 8, 2019, 7:55 PM IST

मुंबई - अमित शाहंसोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या खोलीत चर्चा झाली होती. पद आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप, असे त्यावेळी ठरले होते. मात्र, भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे मी जाणीपूर्वक मुख्यमंत्र्यांचे फोन उचलले नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने ठरवावे त्यांना खरे बोलणारे हवे की, खोटे बोलणारे सरकार हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

राज्याने ठरवावे खरे बोलणारे हवेत की खोटे बोलणारे?

विधानसभा निकालानंतर अमित शाहांचा फोन नाही -

लोकसभा निवडणुकीला अमित शाहांचा अनेकदा फोन आला. मात्र, यावेळी त्यांनी एकदाही फोन केला नाही. १२४ जागा स्वीकारल्या हा माझा गुन्हा आहे का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणाले आमच्यासोबत 'ते' होते की नाही माहिती नाही. आम्ही सोबत नसतो तर कामे झाली असती का? असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना पक्षप्रमुखांवर खोटारडेपणाचा आरोप केला. याचे दुःख झाले आहे. अमित शाहांचा संदर्भ घेऊन फडणवीसांनी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर खोटे आरोप केले असल्याचे ठाकरे म्हणाले.

अमित शाहंसोबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या खोलीत चर्चा

भाजपचे पर्याय समोर आल्यानंतर शिवसेनेचे पर्याय दाखवू -

बहुमत नसताना सरकार आमचेच येणार, आमच्यापैकी कोणाचीही मदत न घेता सरकार आणून दाखवा. तुमच्याकडे इतर पर्याय असतील, तर आमच्याकडे पर्याय असणे काय चुकीचे आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच भाजपने लवकरात लवकर सत्ता स्थापनेचा दावा करावा, नाहीतर पर्याय खुले आहेत, असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे. भाजपकडून त्यांचे पर्याय समोर येऊ द्या, मग आम्ही आमचे पर्याय दाखवू, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

उदयनराजेंना पगडी, शिवसेनेला टोपी -

फोडाफोडी करून घेतलेल्यांनाही मी स्वीकारले. उदयनराजे यांना भाजपने घेतले. त्यालाही आम्ही विरोध केला नाही. मोदीजींवर मी टीका केली नाही. मोदी मला भाऊ मानतात. त्यामुळे कदाचित कोणाच्या पोटात दुखत असेल. त्यामुळे ते लोक काड्या करण्याचा प्रयत्न करत असतील. भाजपने उदयनराजेंना पगडी घातली आणि आम्हाला टोप्या घातल्या, असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपची काँग्रेससोबत चर्चा -
आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा केलेली नाही. काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल अमित शाहांचे मित्र आहेत. अहमद पटेल नितीन गडकरींचे मित्र आहेत. भाजपची काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे, आमची नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

खोटारड्यांसोबत आम्ही चर्चा करणार नाही -
भाजपच्या नेत्यांवर आम्ही वैयक्तीक टीका केलेली नाही. अटल बिहारी वाजपेयींवर देखील कधी टीका केली नाही. फक्त भाजपच्या धोरणावर टीका केली. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करीत आहेत. मात्र, अशा खोटारड्या भाजपसोबत आम्ही चर्चा करणार नाही. आता संघाला विचारायचे आहे की, त्यांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत खोटे बोलणारे माणसे बसतात का?

गंगा स्वच्छ करताना यांची मन कलुषित झाली. सत्तेची लालच एवढ्या स्तराला गेली, असे वाटले नव्हते. मी यांच्यासोबत गेलो, याचे वाईट वाटते. शब्द देऊन फिरवणारे आम्ही नाही, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 8, 2019, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.