ETV Bharat / state

Uddhav Thackeray Met Sharad Pawar : उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा - सिल्व्हर ओक

कर्नाटक सीमावादावरुन राजकारण तापले असताना, गुजरातमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात भेट झाली आहे. या घडामोडीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. (Uddhav Thackeray Met Sharad Pawar).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 12, 2022, 10:34 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 83 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. (Uddhav Thackeray Met Sharad Pawar). या दरम्यान दोन नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार सचिन अहिर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते

विविध मुद्यांवर चर्चा : महाराष्ट्रातील महापुरुषांचा होणारा अवमान, बेताल वक्तव्य करणारे सत्ताधारी नेते व महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा येत्या 17 डिसेंबरला राज्य सरकारविरोधात मोठा मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचा विरोध मोडून काढण्यासाठी भाजपने देखील रणनीती आखली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांना पाठवलेले पत्र हे त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे कर्नाटक सीमावादावरुन राजकारण तापले असताना, गुजरातमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात भेट झाली आहे. या सर्व घडामोडीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

अंबादास दानवे यांनी भेट घेतली : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील शरद पवार यांची संध्याकाळी उशिरा भेट घेतली. येत्या 19 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांकडे विविध मुद्द्यांचे अस्त्र आहे. यांचा वापर कशा पद्धतीने करावा या संदर्भात दानवे यांनी पवार यांचे मार्गदर्शन घेतल्याचे समजते.

अंबादास दानवे यांनी भेट घेतली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.