मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव, धनुष्यबाण पक्षाचे देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. या आयोगाच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्याने टीका करत आहेत. आज रामनवमीनिमित्त, त्यांनी आज धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे सेनेवर जोरदार फटकारे ओढले. नागपूर मधील रामटेक येथील प्रभु राम मंदिरावरील झेंडा उध्दव ठाकरे यांना देण्यात आला.
लोकशाही वाचवणे महत्त्वाचे : उद्धव ठाकरे म्हणाले की, आज रामनवमी आहे. सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. सध्या देशात लोकशाही वाचवणे महत्त्वाचा आहे. हे काम माझे एकट्याचे नाही. आपल्या पुढील पिढ्यांसाठी सर्वाना एकत्र यावेच लागणार आहे. आपल्या देशाचे आता 75 वे वर्षे आहे. आपल्या देशासाठी स्वातंत्र्य हे 75 वर्षासाठी होते का? हा प्रश्न आपल्याला पुढील पिढी विचारेल. असा प्रश्न उपस्थित केल्यास आपण काय करणार?. संविधानाचे रक्षण करण्यासाठी आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे. या संविधानाला नष्ट करण्याची हिंमत कोणाची आहे, हे मी बघतो. तुम्ही संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे असे अव्हान उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
धनुष्यबाण चोरला : आज आपला धनुष्यबाण काही काळासाठी चोरला गेला आहे. कागदाचा बाण नेला असला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत. तुमच्यासारखे भात्यातील बाण, ब्रह्मास्त्र माझ्यासोबत आहे. एकेकाळी प्रभू रामाचे नाव लिहून दगड तरंगत असायचे. राजकारणात प्रभू रामाचे नाव घेऊन आता काही जण तरंगत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला भाजपला लगावला. तसेच आज दगड तरंगत असून राज्य सुद्धा दगडच तरंगत आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी जोरदार शिंदे सेनेवर टीकास्त्र सोडले.
सध्या कठीण काळ : आपल्या या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ही वाचवण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र लढायला हवे. ही यात्रा थांबता कामा नये. आपण शिवसेना प्रमुखांचा उध्दव ठाकरें यांचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत. अत्यंत कठीण परिस्थितीत आपण चाललो आहे. महाराष्ट्र जातोय, देश जातोय, तशी आपली शिवसेना सुध्दा त्या संघर्षातून जाते आहे. शिवसेना पुन्हा एकदा उभी राहत आहे. या देशात संविधान, लोकशाही टिकेल तर, देश टिकेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.