मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखल करताना खोटी माहिती दिल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोर्लाई (अलिबाग) येथे 21 मार्च 2014 रोजी अन्वय नाईक यांच्याकडून 19 बंगले विकत घेतले असून अन्वय नाईक यांचा आत्महत्येनंतर ही मालमत्ता स्वताच्या नावावर हस्तांतर केल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला. परंतु निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखल करताना मुख्यमंत्री यांनी याचा उल्लेख केला नसल्याचे किरीट सौमैया म्हणाले.
हेही वाचा - बॉलिवूड ट्विट प्रकरण; कंगनाला मुंबई उच्च न्यायलयाचा दिलासा कायम