मुंबई - सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. राज्यातून हजारो लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे, असे शिंदे म्हणाले.
-
ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी आज नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. #Shivsena pic.twitter.com/1C9XrE8N29
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी आज नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. #Shivsena pic.twitter.com/1C9XrE8N29
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 13, 2023ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण सुभाष देसाई यांनी आज नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. #Shivsena pic.twitter.com/1C9XrE8N29
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 13, 2023
आमदार प्रताप सरनाईक, आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया - माझा मुलगा भूषण देसाई याने शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धव ठाकरे व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, यापुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली.
भूषण देसाईंचा शिवसेनेत प्रवेश - बाळासाहेबांसोबत ज्यांनी काम केले ते आमच्यासोबत आले आहेत. शिवसेनेसाठी पक्षप्रवेशाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात आम्ही रेखाटले आहे. राज्याचा विकास करणारे निर्णय आम्ही घेतले आहेत. मुंबईत अनेक वर्षांची सत्ता असूनही त्यांना जे करता आले नाही ते आम्ही सहा महिन्यात केले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि आमच्या सरकारचे काम लक्षात घेऊन भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन मी करतो. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी - शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना हे दोन सोडून माझ्या डोळ्यासमोर काहीच आलेले नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे कोण घेऊन जात असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या कामाचा वेग व त्यांची क्षमता, त्यांचे निर्णय आणि सर्वसामान्य जनतेला कामाचा अनुभव मिळतो. त्यासाठीच त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. निवडणूक किंवा कोणत्याही पदासाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो नाही, पण जबाबदारी मिळेल ती पार पाडेल, असे भूषण देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरेंना टोला - भूषण देसाई यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायची आहे त्यांनी मारावी, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला प्रतिउत्तर देताना, आमच्याकडे येतात ते वॉशिंगमशीनमध्ये उडी मारून येतात. मग तुमच्याकडे येतात ते कोण आणि कशासाठी? असा प्रतिसवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
सुभाष देसाई यांच्याबद्दल - सुभाष देसाई यांचा जन्म 12 जुलै 1942 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांचा शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात सक्रीय सहभाग राहिला आहे. मुंबईत गोरेगाव येथे गोरेगाव धर्मादाय संस्था माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे त्यांनी आयोजन केले होते. अमेरिका, जर्मनी, जपान आदी देशांचे दौरे देखील त्यांनी केले आहेत. 1990 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. 2004, 2009 मध्ये ते सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते 2009 ते 2014 या दरम्यान शिवसेनेचे विधिमंडळ नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदी सुभाष देसाई यांची निवड करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये तेउद्योगमंत्री होते. 2015, 2016 मध्ये ते पहिल्यांदाच विधान परिषदेवर गेले.