मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही विधान भवन येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करताना एकनाथ शिंदे हे मंत्री असताना उद्धव ठाकरे यांना पैसे पोहोचवायचे असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आज इतरांवर खोके जमवल्याचा आरोप करत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे किती खोके पोहोचवलेत हे आपल्याला आणि एकनाथ शिंदे यांना माहित आहे असा चिमटा ही पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.
उद्धव ठाकरेंनी केली शिवसेनेची वाताहात : उद्धव ठाकरे आता केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास गाडीचे नेते आता राज्यभर सभा घेणार आहेत. अडीच वर्षात त्यांनी काय काम केलं, हे आता या सभेतून सांगण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करेल असही नारायण राणे यावेळी म्हणाले. तसेच तीन दिवसांपूर्वी रत्नागिरी मध्ये उद्धव ठाकरे यांनी घेतलेली सभा ही मॅनेज करण्यात आली होती. ती सभा अजिबात विराट नव्हती. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे वाताहात केली असून, महाराष्ट्रातून शिवसेना संपवण्याचा काम उद्धव ठाकरे यांनीच केलं, असाही टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र पंतप्रधान होणे म्हणजे जेवण नाही. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा आरोग्यही सांभाळता येत नाही. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याला जास्त गांभीर्याने घेऊ नये असाही चिमटा नारायण राणे यांनी यावेळी काढला.
शरद पवार काहीही करू शकतील : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार निवडून आले आहे. आता भारतीय जनता पक्षासोबतच नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करणार आहे. शरद पवार हे काहीही करू शकतील असा चिमटा ही नारायण राणे यांनी यावेळी काढला.
हेही वाचा - Sachin Vaze : 100 कोटी भ्रष्टाचार प्रकरणाची आरोपी सचिन वाझे न्यायालयात हजर