ETV Bharat / state

राज्य संकटात असताना, मुख्यमंत्री तेलंगाणात प्रचारात दंग; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Press Conference : राज्यात नियोजन शून्य विकासकामे सुरू आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपावर हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde
उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 4:15 PM IST

प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे

मुंबई Uddhav Thackeray Press Conference : अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सरकारनं दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे, अशी मागणी होत आहे. यावर विरोधकांकडून सरकारवर टीका केला जात असताना, आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन, राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) जोरदार हल्लाबोल केला.

भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत : शिवसेनेची मते मी जनतेपर्यंत पोहचवतो, तुम्ही सुद्धा निष्पक्षपणाने आमची मते राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहचवत असता. आज कधीही नव्हतं एवढं प्रदूषण राज्यात आहे. शेतीचं अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं खरीपाची उशिरा लागवड झाली. मात्र या सगळ्यात मुख्यमंत्री कुठे आहेत? माझ्या माहितीप्रमाणे ते तेलंगणात गेले आहेत, तिथे जाऊन काय करणार? काय बोलणार? हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला.

सरकार आपल्या दारी आणि हेच दुसऱ्याच्या दारी : आज जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, स्वत:ची घरे सोडून इतरांची घरे धुंडाळत आहेत. राज्यात अवकाळी आणि मुख्यमंत्री तेलंगणात अशी अवस्था आहे. हे भुरटे राज्यावर अन्याय करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केली. एक फुल आणि दोन हाफ सरकार काय करत आहे? राज्याला कोण मायबाप आहे का नाही, अवकाळीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना २० रुपयांचे चेक देऊन शेतकऱ्यांची सरकारने थट्टा केली आहे. तुमच्या शेतीबद्दल आम्हाला आदर आहे. हेलिकॉप्टरने तुम्ही शेती करता, पंचतारांकित शेती करता. आम्ही काही बोललो की, तिथे जाऊन गळा काढता, असं म्हणत ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

...मग शेतकऱ्यांच्या पाठीशी कधी उभे राहणार : मुख्यमंत्री तेलंगणात प्रचारात दंग आहेत, पंतप्रधान क्रिकेट सामना पाहायला जातात. मग माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीवरुन कधी आणि कोण हात फिरवणार? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. सरकार आपल्या दारी, आणि हेच दुसऱ्याच्या दारी फिरत आहेत. पीकविम्यावरून शिवसेनेनं आंदोलन केलं. ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्याविषयी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.

राज्यात काही तालुक्यात, जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला पाहिजे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. घरंदारं उघडी पडली आहेत. पण हे तेलंगाणात गेलेत. लाज वाटत नाही का यांना, मग गद्दार म्हणत आहे की, आम्ही मुंबईतील रस्ते धुणार, पण यासाठी पाणी कुठून आणणार?. राज्यातील सरकार म्हणजे दुष्काळात १३ वा महिना आहे. राज्यात संकट असताना, राज्यातील मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात जातात, म्हणजे त्यांना त्या पदावर राहण्याचा बिल्कुल अधिकार नाही - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख ठाकरे गट

भाजपाने थापांना आवर घालावा : निवडणुका होत नाहीत, पण जेव्हा होतील तेव्हा निवडणुकीत भाजपाचे कुभांड उघडे पडेल. केवळ घोषणा नको प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करा. सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला पाहिजे. सरकारने दुष्काळ जाहीर करुन ताबडतोब शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपा फक्त थापा मारत आहे. घोषणांचा पाऊस पाडत आहे, पण याला आता भाजपाने आवर घालून, प्रत्यक्ष मदत केली पाहिजे.

हेही वाचा -

  1. मतदारांनी नाकारलं तर उद्या ते त्यांच्या विरोधातही बोलतील, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
  2. Uddhav Thackeray News : धर्माच्या नावावर मत मागणं योग्य आहे का? उद्धव ठाकरे यांच निवडणूक आयोगाला पत्र
  3. ठाकरे सरकारच्या काळात मुंबईत 20 हजार कोटीचा घोटाळा; किरीट सोमैयांची उच्च न्यायालयात याचिका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.