मुंबई - जालना मतदारसंघातील वादावर उध्दव ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया दिली. 'आज दवाखाना बंद आहे' असे म्हणत रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांच्यात सुरू असलेल्या जालना मतदारसंघातील वादावर भाष्य त्यांनी भाष्य केल.
रावसाहेब दानवे व अर्जुन खोतकर यांच्यात सुरू असलेल्या जालना मतदारसंघातील वादावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले होते, की या २ नेत्यांचा बीपी कधीही वाढतो, मग त्यांना उद्धवजींच्या दवाखान्यात जावं लागत. आज संध्याकाळी अपॉइंटमेंट आहे हे कळतय. त्यावर आज मुख्यमंत्री नागपूरला असल्याने आज चर्चा होणार नाही, असे सांगताना आज दवाखाना बंद आहे अशी मिश्कील प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
जालना मतदार संघातील वाद सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होणार होती. या भेटीदरम्यान अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वादावर पडदा पडणार होता. मात्र, मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर होते त्यामुळे ही भेट उद्या होणार आहे.
मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावरही उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे टीका केली. मुंबईत सर्वत्र धूळ असून अॅलर्जी पसरली आहे. निसर्गातील झाड कापायची आणि सिग्नलवर एअरप्युरीफाय लावायचे , याचा काय ? अर्थ असे उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.