ETV Bharat / state

घड्याळाचे काटे काढले नसून, फक्त चावी देण्याचे काम केले - उद्धव ठाकरे - मराठी

मला फोडलेली माणसे नको आहेत तर मनाने जिंकणारी माणसे हवी आहेत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत केले. मी घड्याळाचे काटे काढले नसून फक्त चावी देण्याचे काम केले असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला टोला
author img

By

Published : Jul 25, 2019, 12:56 PM IST

Updated : Jul 25, 2019, 2:21 PM IST

मुंबई - मला फोडलेली माणसे नको आहेत तर मनाने जिंकणारी माणसे हवी आहेत, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत केले. मी घड्याळाचे काटे काढले नसून फक्त चावी देण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष प्रवेश करणार नाहीत, असे म्हणत ठाकरेंनी पवारांनाही टोला लगावला. मला खात्री आहे आपल्या निर्णयाचा आपल्याला पश्चाताप होणार नसल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.

हिंदूची ताकद वाढतेय

नुसती शिवसेनेची नाही तर मराठी माणसांची आणि हिंदुंची ताकद वाढत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ताकद वाढल्यामुळे हिंदू व मराठी माणसाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही. सर्वांनी हसत मुखाने शिवसेनेत प्रवेश केला, आपण या क्षणाचे साक्षीदार झालात याचा आनंद होत असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेनेत चांगले लोक येत आहेत, त्यांचे स्वागतच आहे.

घड्याळाचे काटे काढले नसून, फक्त चावी देण्याचे काम केले - उद्धव ठाकरे

आमचं आम्ही ठरवलंय

सचिन अहिर यांच्यावर कोणती जबाबदारी देणार असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न केल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की आमचं आम्ही ठरवलंय. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. अहिर यांच्यावर पश्चातापाची वेळ येणार नसल्याचेही ठाकरे म्हणाले. निवडणूक जिंकण्यासाठी जनतेसमोर जावे लागत आहे. जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आदित्य फिरत आहे. दोन्ही पक्षांच्या यात्रा वेगळ्या वाटल्या तरी युतीच्या विजयासाठीच असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

Intro:Body:

[7/25, 11:52 AM] Jyoti Pednekar, Mumbai: आदित्य ठाकरे

काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, महाराष्ट्र मुंबई साठी काम करण्याची स्वप्न एकच आहे,

ही भेट मी उध्दव ठाकरे यांची भेट घडवून आणली

पक्ष वाढायला मदत होईल

आणि महाराष्ट्रासाठी शिवसेनेची जी स्वप्न आहेत ते पूर्ण होईल

[7/25, 11:52 AM] Jyoti Pednekar, Mumbai: सचिन अहिर

शिवसेनेच केंद्र बिंदू म्हणून नाही तर विकास म्हणून पुढे नेण्याचा काम उध्दव ठाकरे यांनी केला

एक वेळ होती मी वेगळी टीका केली होती...त्यावेळी आम्ही जेवायला गेलो होतो

त्यावेळी दोघानी हस्त आंदोलन केले

पवार साहेब हृदयात राहतील तर शरीरात उध्दव व आदित्य राहतील

राष्ट्रवादी तोडणार नाही तर शिवसेना पक्ष वाढवणार

मोठया जिद्दीने व जोमाने माझे कार्यकर्ते काम करतील आणि महाराष्ट्रात सतेत येतील

मी गेल्या आठवड्यात पवार साहेबांना भेटलो, माझ्या मतदारसंघाची माहिती सांगितली, काही पक्षातील नेत्यांनी माझा निंर्णय सकारात्मक असल्याचे सांगितले

महाराष्ट्राची चर्चा करूया

[7/25, 11:52 AM] Jyoti Pednekar, Mumbai: उध्दव ठाकरे

तुमचं स्वागत करताना आनंद होतो

राजकारणी राजकारणात वागावं लागत

मला फोडलेली मानस नको मनाने जिंकणारी माणसे हवेत

सर्व हस्त मुखाने या क्षणाचे साक्षीदार झालेत याच आनंद होतोय

शिवसेनेची ताकद वाढतेय

नुसती शिवसेना नाही तर मराठी माणसाची व हिंदूंची ताकद वाढतेय

मला खात्री आहे आपल्या निर्णयाचा पचताप होणार नाही

आणि हिंदू व मराठी माणसाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही

आमचं काय आम्ही ठरवलं आहे

अजून निवडणूकिला वेळ आहे

शिवसेनेत चांगली लोक येत आहेत त्यांना पक्ष घेऊन द्या

घड्याळ ची दोरी काढली नाही तर त्याला चावी देण्याचं काम करतोय

पक्ष श्रेष्टी येणार अस वाटत नाही

बाळासाहेबांचे सर्व शिवसैनिक आज हस्तमुखाने सोबत आहेत

नीतिमत्ता गहाण सोडुन वागणार नाही मात्र पक्ष वाढवण्यासाठी जे करावं लागेल तेच करेल

मन जिकायची आहे त्यात पहिलं मन जिंकल आहे

निवडणूक जिंकण्यासाठी जनतेसमोर जावं लागतं , आशीर्वाद मिळवण्यासाठी आदित्य फिरतोय

दोन्ही यात्रा वेगळ्या वाटल्या तरी युतीच्या विजयासाठी आहेत

Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.