मुंबई - सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी 'आज हरलो आहे, पण थांबलो नाही, जिंकलो नाही, पण संपलो ही नाही'असे म्हटले आहे. तसेच यापुढे जनतेच्या सेवेत सदैव तत्पर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अवघ्या ५ महिन्यात राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडूनआलेले उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रारमराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्याच्या जागेची पोटनिवडणूक लागली. उदयनराजेंना भाजपने तिकीट दिले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने सिक्कीमचे माजी राज्यपाल शरद पवारांचे विश्वासू श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले. यामध्ये पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. हा पराभव उदयनराजेंच्या जिव्हारी लागला आहे.