ETV Bharat / state

Coroanvirus : विद्यापीठांच्या परीक्षा होणारच, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

परीक्षा होणार की नाही, यासंदर्भात राज्यातील पालक आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी राज्यातील 13 अकृषी विद्यापीठातील कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत याबाबतचे चित्र स्पष्ट केले.

uday samant
उदय सामंत
author img

By

Published : Apr 6, 2020, 3:43 PM IST

मुंबई - राज्यातील सर्व विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आणि त्यासोबत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा या होणारच आहेत. त्यात तुर्तास कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत वाट पाहा, असे आवाहन आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक

परीक्षा होणार की नाही, यासंदर्भात राज्यातील पालक आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी राज्यातील 13 अकृषी विद्यापीठातील कुलगुरूंसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत याबाबतचे चित्र स्पष्ट केले. या बैठकीत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या रखडलेल्या परीक्षांचा आढावा घेतला. कोरोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर सर्व विद्यापीठांमध्ये एकाच कालावधीत परीक्षा घ्याव्यात यासाठीचे नियोजन करावे, अशा सूचना सामंत यांनी दिल्या.

यासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी 4 विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 2 संचालकांची एक समिती जाहीर केली. ही समिती राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा या एकाच कालावधीत कशा प्रकारे घेता येतील तसेच इतर सीईटीसोबत विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यासाठी सामाईक प्रवेश परीक्षा यांचे नियोजन कसे करता येतील याचा कार्यक्रम ठरवणार आहे.राज्यातील लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हा स्तरावरही वेगळे काही नियोजन करता येईल काय, त्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही सामंत यांनी दिल्या.

  • मुख्यमंत्री निधीसाठी एक महिन्याचे वेतन -

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे जाहिर केले. तसेच राज्यात ज्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात संघटना, संस्था आहेत, त्यांच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनीही आपले किमान एक महिन्यांचे वेतन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी द्यावे, असेही आवाहन केले.

  • ऑनलाईन कौन्सिलिंग केंद्र वाढवा -

कोरोना आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीतीचे निराकरण करण्यासाठी आणि योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील काही विद्यापीठांनी ऑनलाईन कौन्सिलिंग केंद्र सुरू केले आहे. अशा प्रकारचे केंद्र राज्यातील विद्यापीठांनी वाढवावे आणि राज्यातील जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि त्यांना योग्य मदत मिळण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही सामंत यांनी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.