मुंबई : पेट्रोल डिझेल येत्या काही वर्षांत संपणार आहे. मग जग धावणार कसं? अर्थव्यवस्था चालणार कशी ? असा प्रश्न नक्की पडणार. कारण लाखो हजारो वर्षांची भूगर्भातील तयार झालेली खनिजे आपण औद्योगिक क्रांतीपासून म्हणजे 200 वर्षापासून वापरत (vehicles Will Run On Green Energy) आहोत. मात्र इंधन म्हणजे खनिज साठा आटत चालला आहे. दुसरी बाजू अशी की, पेट्रोल डिझेलमुळे प्रचंड प्रदूषण देखील होते. मग करायचं काय ? जगभर शोध सुरू आहे. मात्र आपल्या आयआयटी मुंबईतील संशोधकांनी प्रवासी वाहतुकीची समस्या पाहुन यावर उपाय शोधला आहे. काय आहे उपाय जाणून (Research by Mumbai professor) घेऊ.
प्रयोग सुरू : भारत सरकार आणि जगातील सर्वच राष्ट्रांनी हे मान्य केले की, पेट्रोल डिझेलमुळे कार्बन डाईऑक्साइड प्रचंड प्रमाणात निघतो. परिणामी वातावरण प्रदूषित होते. म्हणून सूर्याच्या ऊर्जेचा वापर देखील करून काही प्रयोग सुरू आहेत. गावात पवन चक्क्यांद्वारे वीज निर्मिती, नाहीतर सौर पॅनल तयार करून त्यातून वीज निर्मिती केली जात आहे. मात्र दुचाकी चारचाकी वाहन आणि विमान, जहाजे यांना देखील पारंपरिक इंधनावर काम भागवावी लागते. मात्र पेट्रोल डिझेल प्रचंड खर्चिक आणि प्रदूषण निर्माण करणारे आहे. म्हणून त्यावर जगभर शोध सुरू आहे. तसाच आयआयटी मुंबईत देखील सुरू आहे.
वायूचे रूपांतर उर्जेमध्ये : आपण घरातील रोज वापरतो, तो ग्यास सिलेंडर पाहिला तर त्यात मिथेन वायू असतो. त्याला पेटवले की अग्नी सुरू होतो. मात्र त्या टाकीत मिथेन ऐवजी हायड्रोजन भरायचा आणि पेटवायची गरज नाही. तर त्या वायूचे रूपांतर उर्जेमध्ये करायचे. हे रूपांतर दुचाकीमध्येच होईल. चार चाकीमध्ये देखील होईल आणि वाहने त्यावर चालतील. हायड्रोजनला जाळून काम केले तर कार्बन जास्त निघतो. मात्र त्याला जाळण्याऐवजी त्याचे रूपांतर उर्जेमध्ये करायचे, असा तो भन्नाट प्रयोग सुरु (aircraft will run on green energy) आहे.
ग्रीन एनर्जी प्रयोग महत्वाचा : ह्या शोधाबाबत काम आयआयटी मुंबईचे प्राध्यापक प्रकाश घोष करत आहेत. आपला देश तंत्रज्ञान विकत घेणारा देश आहे. अद्याप युरोपियन देशाप्रमाणे तंत्रज्ञान शोध आणि विकास तसेच प्रत्यक्षात रोजच्या व्यवहारात ते उत्पादन रूपाने आणणे हे महत्वाचे आहे. त्यात भारताचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून ह्या प्रयोगाकडे पाहता येईल. आपण परंपरागत डिझेल पेट्रोल ह्या जिवाश्म पासून खनिज रुपात तयार होतात. आपण जमिनीत खोदून ते खनिज काढतो, त्यावर प्रक्रिया करतो आणि विविध तेल इंधनासाठी वापरतो. मात्र तो जमिनीखालील साठा संपणार आहे. म्हणून त्याऐवजी नवीन पर्याय हा आहे ग्रीन एनर्जी. ज्यात हायड्रोजन वायू पासून टू व्हीलर किंवा फॉर व्हीलरमध्येच ऊर्जा तयार होईल, असे तंत्र विकसित करीत आहोत. इलेक्ट्रिकवर चालणारी वाहन शेवटी चार्ज करावेच लागते. मात्र ते लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणे मुश्किल आहे. म्हणून ग्रीन एनर्जी प्रयोग महत्वाचा आहे. असे ते (green energy) म्हणाले.
ग्रीन एनर्जी : संशोधक प्रकाश घोष सांगतात की, पेट्रोल आणि डिझेल यामुळे प्रचंड प्रदूषण तयार होते. मात्र हायड्रोजनचा आपण असा वापर करीत आहोत की, कार्बन तयार होणार नाही. म्हणजेच प्रदूषण नियंत्रित होईल. म्हणून ग्रीन एनर्जी याला पाहिले जाते. ह्यामुळे समजा शहरातून शहरात किंवा गावात लांब एक हजार किमी अंतर (two wheeled) जायचे आहे. तिथे इलेक्ट्रिक वाहन नेले तरी चार्जिंग स्टेशन लागणार. चार्जिंगसाठी 2 तास मोठ्या गाडीला लागणार. पुन्हा जागा लागणार खर्च मोठा लागणार. बॅटरी वापरली तरी बॅटरी चार्जिंगला वेळ पैसे लागणार. प्रदूषण त्यातही आहेत. मात्र सुर्याच्या उर्जेपासून, हायड्रोजन पासून पुन्हा ऊर्जेत रूपांतर करणे म्हणूच याला ग्रीन एनर्जी म्हटले जाते. भारतामध्ये आज तुरळक एक दोन कार ज्या हायड्रोजनवर चालू आहे, त्या जपानच्या टोयाटो आणि निराकी या कंपनीचे खाजगी वाहन आहे. मात्र आयआयटीचा प्रयत्न प्रवासी वाहतुकीसाठी आहे. म्हणजेच जगातली प्रचंड लोकसंख्या भारतात आहे. आणि येथील प्रवाशांना स्वस्त प्रवास परवडण्यासाठी हा शोध मोलाचा आणि मैलाचा दगड म्हणून सिद्ध होणार आहे.