ETV Bharat / state

राज्यात म्यूकरमायकोसिसचे २००० रुग्ण तर १० जणांचा मृत्यू -केंद्रीय आरोग्य मंत्रालय - mucormycosis patients in maharashtra

वातावरणातील बुरशीजन्य कणांच्या संपर्कात आल्याने लोकांना म्यूकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावर कापण्यामुळे, खरचटण्यामुळे, भाजण्यामुळे झालेल्या जखमेतून किंवा इतर प्रकारच्या त्वचारोगांमुळे झालेल्या जखमेतून या बुरशीचा शिरकाव झाल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो.

Mucormycosis
म्यूकरमायकोसिस
author img

By

Published : May 14, 2021, 3:29 PM IST

Updated : May 15, 2021, 4:41 PM IST

मुंबई - एकीकडे नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. त्यात दुसरीकडे म्यूकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार कोरोनातून बरे झालेल्यांना होत आहे, असे आढळून येत आहे. राज्यात आतापर्यंत या आजाराने सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारांहून अधिक लोकांना या दुर्मिळ आजाराचा संसर्ग झाला आहे. काही रुग्णांना या आजारामुळे आपली दृष्टीही गमवावी लागली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.

हा आजार कसा संभावतो, त्याचा आणि कोरोनाचा संबंध काय?, याबाबत काय काळजी घ्यावी, उपचार कसे करावेत याबाबतही मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे -

म्यूकरमायकोसिस कशामुळे होतो? -

वातावरणातील बुरशीजन्य कणांच्या संपर्कात आल्याने लोकांना म्यूकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावर कापण्यामुळे, खरचटण्यामुळे, भाजण्यामुळे झालेल्या जखमेतून किंवा इतर प्रकारच्या त्वचारोगांमुळे झालेल्या जखमेतून या बुरशीचा शिरकाव झाल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो. आयसीएमआरने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या रुग्णांमधील अनियंत्रित मधुमेह आणि स्टेरॉईडच्या वापरामुळे रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होणे, अतिदक्षता विभागात, रुग्णालयात दीर्घकाळ दाखल असणे, अवयव प्रत्यारोपण ट्युमर, कर्करोग कारक पेशींची उपस्थिती यामुळे म्यूकरमायकोसिस संसर्गाचा धोका वाढू शकतो.

या रोगाचा आणि कोरोनाचा संबंध काय? -

म्यूकरमायकोसिस याला सामान्यपणे काळी बुरशीही म्हटले जाते. या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे होणारा आजार आहे. सभोवतालच्या वातावरणात असलेल्या म्यूकर मायसेटीस या सूक्ष्म-जीवांमुळे हा आजार होतो. म्युकरमायसेटीस मातीत किंवा पाने, खते अशा सडत/विघटित होत जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळतात. कोरोनातून बरे होत असलेल्या किंवा बरे झालेल्या रुग्णांना या बुरशीचा संसर्ग होत असल्याचे आढळत आहे.

कोरोना आणि मधुमेह झालेल्यांना आजाराची भीती -

केवळ कोविड रुग्णच नाही तर ज्यांना मधुमेह आहे, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे, अशा लोकांनाही म्युकरमायकोसिस होऊ शकतो. आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती अशा बुरशीच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यास सक्षम असते. मात्र, कोविड रुग्णांवर उपचार करतांना रोगप्रतिकार दाबून टाकणारी डेक्समेथासोन सारखी औषधे असतात. या औषधांमुळे माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. त्याशिवाय जे रुग्ण ऑक्सिजन आधारावर अतिदक्षता विभागात उपचार घेत असतात, तिथे या प्रणालीमध्ये ह्युमिडीफायर असते. यामुळे पाण्यातील आर्द्रतेतून बुरशी संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक कोरोना रुग्णाला म्यूकरमायकोसिसचा धोका संभवतो. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. मात्र, त्याचवेळी जर त्यावर योग्य आणि वेळेत उपचार केले गेले नाहीत, तर तो प्राणघातकही ठरु शकतो.

आजाराची सामान्य लक्षणे काय आहेत? -

म्यूकरमायकोसिस हा आजार सायनस म्हणजेच नसिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतरच्या पातळीत हा संसर्ग फुफ्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरू शकतो. या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात किंवा तेथील त्वचेचा रंग बदलतो. दृष्टी अधू होते, छातीत दुखू लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आणि खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे जाणवू शकतात. मात्र, नाक चोंदण्याच्या सगळ्याच रुग्णांना जिवाणूजुन्या सायनसिटीस झाला असावा, असे गृहीत धरु नये, असा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिला आहे. विशेषतः कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असताना किंवा झाल्यावर हे लक्षात घ्यावे. हा बुरशीसंसर्ग आहे का हे जाणून घेण्यासाठी, वैद्यकीय तपासणी आणि सल्ला घेणे उचित ठरेल.

त्यावर उपचार कसे करतात? -

साध्या त्वचा संसर्गापासून म्यूकरमायकोसिसची सुरुवात होत असली तरी तो शरीराच्या इतर भागात पसरू शकतो. यावर उपचार करताना सर्व मृत आणि संसर्ग झालेल्या ऊती शस्त्रक्रिया करून काढून टाकाव्या लागतात. त्यामुळे काही रुग्णांना वरचा जबडा गमवावा लागतो किंवा काही वेळा अगदी डोळादेखील गमवावा लागतो. तसेच 4 ते 6 आठवड्याचे इंट्राव्हेनस अँटी-फंगल उपचार, रुग्णाला संसर्गमुक्त करण्यासाठी करावे लागतात. याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असल्याने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अंतर्गत औषध तज्ञ, इंटेन्सिव न्यूरॉलॉजिस्ट, कान- नाक-घसा तज्ञ, नेत्रविकारतज्ञ, दंतवैद्य, शल्यविशारद आणि इतरांचा समावेश असलेल्या एका टीमची उपचारांसाठी गरज भासते.

हेही वाचा - 'म्यूकरमायकोसिस गंभीर आजार; वेळीच उपचार करा, अन्यथा...'

म्युकरमायकोसिसला प्रतिबंध कसा करता येतो? -

मधुमेही असलेल्या कोरोना रुग्णांनी अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवणे हा सर्वात आधी केल्या जाणाऱ्या प्रतिबंधक उपचारांपैकी एक असल्याचे आयसीएमआरने सांगितले आहे. स्वयं उपचार आणि स्टेरॉईडचा प्रमाणाबाहेर वापर यामुळे जीवावर बेतू शकते आणि म्हणूनच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच औषधे घेतली पाहिजेत.

स्टेरॉईडच्या अयोग्य वापरांमुळे विपरीत परिणाम -

स्टेरॉईडच्या अयोग्य वापरांमुळे होणाऱ्या विपरित परिणामांबाबत बोलताना नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले की कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात स्टेरॉईडचा वापर कधीही करू नये. रुग्णाने योग्य त्या औषधांचाच वापर केला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट दिवसच या औषधांचा वापर केला पाहिजे. औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांचा योग्य प्रमाणात वापर झाला पाहिजे.

रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने बुरशीसंसर्ग -

स्टेरॉईड व्यतिरिक्त टोसिलिझुमाब, आयटोलिझुमाब यांच्या वापराने देखील रोगप्रतिकारक्षमता प्रणालीवर परिणाम होतो. कोरोना विषाणू दाहकारक सायटोकिन्सचा स्राव सोडत असल्याने मल्टीऑर्गन फेल्युअर सारखी गंभीर स्थिती निर्माण होत आहे. तसेच त्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांमुळे रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे ही औषधे योग्य प्रकारे वापरली नाहीत तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे बुरशीसंसर्गाला तोंड देण्यामध्ये ती अपयशी ठरण्याचा धोका निर्माण होतो. रोगप्रतिकार क्षमतेला चालना देणाऱ्या किंवा ती दाबून टाकणाऱ्या, अशा इम्युनोमॉड्युलेटिंग ड्रगचा वापर कोरोना रुग्णांनी थांबवावा, अशी सूचना आयसीएमआरच्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे. असे विपरित परिणाम टाळण्यासाठी टोसिलिझुमाबच्या मात्रेमध्येही कोविड कृती दलाने सुधारणा केली आहे. तसेच योग्य प्रकारची स्वच्छता राखण्यामुळे देखील हा बुरशी संसर्ग टाळता येतो.

ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी -

ऑक्सिजनचे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या ह्युमिडीफायरमधील पाणी स्वच्छ आहे की नाही आणि ते वारंवार बदलले जात असल्याची खातरजमा करावी. पाण्याची गळती कुठेही होत नसल्याची खातरजमा करावी जेणेकरून ओल्या पृष्ठभागांवर बुरशीची वाढ होणार नाही. रुग्णांनी आपले हात त्याचबरोबर शरीर स्वच्छ ठेवून शरीराची योग्य प्रकारे स्वच्छता राखावी, असे डॉ. पॉल यांनी सांगितले आहे.

कोविडमधून बरे झाल्यावरही दक्षता आवश्यक -

कोविडमधून बरे झाल्यानंतर वर उल्लेख केलेल्या लक्षणांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवावे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, कारण रुग्ण बरे झाल्यानंतर अनेक आठवडे किंवा अगदी महिन्यांनी देखील हा संसर्ग झाल्याची उदाहरणे आढळली आहेत. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्टेरॉईड्सचा आवश्यक तितकाच वापर करावा. या संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास त्यावरील उपचार सुलभ होतात.

हेही वाचा - ठाणे : म्यूकरमायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय होणार सज्ज

Last Updated : May 15, 2021, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.