ETV Bharat / state

राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 पोलिसांचा मृत्यू, 122 जणांना कोरोनाची लागण - Corona infected Police

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्यात पोलिसांची मोठी भूमिका आहे. लॉकडाऊनच्या काळातही पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १४४ झाली आहे.

Police
पोलीस
author img

By

Published : Aug 26, 2020, 3:03 PM IST

मुंबई - राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १४४ झाली आहे. यात १५ पोलीस अधिकारी आणि १२९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात १२२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी होण्यात पोलिसांची मोठी भूमिका आहे. लॉकडाऊनच्या काळातही पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. महाराष्ट्र पोलीस खात्यात आतापर्यंत 14 हजार 189 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली, यामध्ये 1 हजार 517 पोलीस अधिकारी तर 12 हजार 672 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 2 हजार 622 पोलीस कोरोनावर उपचार घेत आहेत. यात 347 पोलीस अधिकारी व 2 हजार 275 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 11 हजार 423 पोलीस कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. बरे झालेल्यांमध्ये 1 हजार 155 पोलीस अधिकारी व 10 हजार 268 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 42 हजार 6 गुन्हे दाखल केले असून क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 829 जणांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. राज्यात पोलिसांवर 336 हल्ले झाले असून याप्रकरणी 891 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 89 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनधिकृत वाहतूकी विरोधात आतापर्यंत 33 हजार 845 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 96 हजार 6 वाहने जप्त केली असून तब्बल 23 कोटी 7 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.