मुंबई - नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने आणखीन 2 जणांना अटक केली आहे. सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांच्यासह सनातन संस्थेचे विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायत सीबीआयकडून आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालय या संदर्भात सीबीआयच्या तपासावर खूश नव्हते. सीबीआय आपला तापस योग्य दिशेने नेत नसल्याचे वेळोवेळी फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, यावर तपास करत सीबाआयने आज मुंबईतून सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर व सनातन संस्थेचा कार्यकर्ता विक्रम भावे या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही रविवारी दुपारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.