ETV Bharat / state

Blood Stock In Mumbai : कोरोनाचे सावट असताना मुंबईच्या रुग्णालयात पुरेसा रक्तसाठा - समर्पण ब्लड सेंटर

मुंबईकरांना कोरोनाची ( Corona Virus Tension ) भीती सतावत आहे. त्यासाठी नागरिक काळजी घेत आहेत. मात्र कोरोना रुग्णांना रक्ताची ( Two Months Blood Stock Available In Mumbai ) सर्वाधिक गरज लागते. त्यासाठी मुंबईच्या रुग्णालयातील रक्तपेढीत पुरेसा रक्तसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील महत्वाच्या रुग्णालयात पुरेसा रक्तसाठा ( Blood Stock In Mumbai Hospital ) उपलब्ध असल्याचेही ईटीव्ही भारतने घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले आहे.

Blood Stock In Mumbai
रक्तदान करताना दाते
author img

By

Published : Dec 31, 2022, 3:18 PM IST

मुंबई - कोरोनाने चीनमध्ये थैमान ( Corona Virus Tension ) घातले असले तरी, त्याची भीती मुंबईपर्यंत पाहायला मिळत आहे. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सार्वजनिक रुग्णालयाचे मॉक ड्रिल घेऊन तयारीचा आढावा घेतला. मात्र कोरोना काळात रक्तसाठा ( Two Months Blood Stock Available In Mumbai ) देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. मुंबईतील रुग्णालयात ( Blood Stock In Mumbai Hospital ) सध्या पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जनसंपर्क अधिकारी करुणा उपाध्याय

कोरोना रुग्णांना सगळ्यात जास्त रक्ताची गरज कोरोनाचे सावट पुन्हा एकदा घोंगवायला सुरुवात झाली आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या कोरोनाच्या हाहाकारानंतर देशातही सुरक्षा संदर्भात पाऊल उचलायला सुरुवात झाली असून, नुकतीच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय ( Union Minister Mansukh Mandaviya ) यांनी देशातील सर्व परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवार २७ डिसेंबर रोजी देशभरातील सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक रुग्णालयामध्ये कोरोना संदर्भात मॉक ड्रिल घेऊन तयारीचा आढावा घेतला. रुग्णालयात नेमकी कशी तयारी आहे. बेडची व्यवस्था काय आहे. उपकरण कोणत्या स्थितीत आहेत. या सर्वांचा आढावा यामधून घेण्यात आला आहे. मात्र यासोबतच कोरोनामध्ये सगळ्यात जास्त रुग्णांना गरज लागते ती रक्तपुरवठ्याची. देशामध्ये यापूर्वी आलेल्या तीन लाटांमध्ये रुग्णालयात रक्तसाठ्याच्या ( Blood Stock In Mumbai Hospital ) उपलब्धता किती महत्त्वाची आहे. याबाबत सर्वांनाच समज आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे सावट समोर असताना रुग्णालयात यावेळी नेमकी काय स्थिती आहे, याचा आढावा घेणेदेखील तेवढेच आवश्यक आहे.

सध्या मुंबईत पुरेसा रक्तसाठा मुंबईत सध्या सर्व रुग्णालय आणि ब्लड बँकेमध्ये ( Two Months Blood Stock Available In Mumbai ) पुरेसा रक्तसाठा असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईला दररोज जवळपास ८०० ते १००० युनिटपर्यंत आत्ताची गरज लागते. यामध्ये वेगवेगळे ऑपरेशन, सर्जरी किंवा डायलिसिस सारख्या महत्त्वाच्या आरोग्य प्रक्रियेमध्ये या रक्त साठ्याचा उपयोग केला जातो. यासाठी मुंबईतील सध्य परिस्थितीत रक्तसाठा पुरेसा असल्याचे मत करुणा उपाध्याय यांनी व्यक्त केले आहे. सध्या मुंबईत चिंता करण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या कोरोनाचे सावट मुंबईत येण्याची शक्यता कमी असली तरी, त्यासाठी आपल्याला तयार राहणे तेवढेच गरजेचे आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना ज्याप्रमाणे रक्तसाठ्याअभावी ( Blood Stock In Mumbai Hospital ) अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. ती परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्याने तयारी केली जाऊ शकते. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी असल्याने आताच जागोजागी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन करणे आवश्यक आहे. यासोबतच परिस्थिती गंभीर झाली तर, त्या परिस्थितीतील रक्तदान आणि प्लाजमा दान करण्यासाठी नागरिक तयार राहतील याबाबतची तयारी देखील असणे आवश्यक असल्याचे मत समर्पण ब्लड सेंटर संस्थेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी करुणा उपाध्याय यांनी व्यक्त केले आहे.

दोन महिने पुरेल इतका रक्तसाठा मुंबईत जानेवारी फेब्रुवारी असे दोन महिने पुरेल असा रक्तसाठा उपलब्ध असल्याचे ब्लड बँक चालवणारे जयसिंग विश्वकर्मा यांनी सांगितले आहे. २७ जानेवारीला अनेक संस्था रक्तदान शिबिराचे कार्यक्रम भरवतात असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होत असते. त्यामुळे दोन ते तीन महिने रक्त साठ्याचा ( Two Months Blood Stock Available In Mumbai ) अभाव जाणवणार नाही. मात्र कोरोनासारखे संकट जरी मुंबई आणि महाराष्ट्रात आले. तरी अशा परिस्थितीत रक्त संकलन केले जाऊ शकते अशी यंत्रणा प्रशासनाने उभी केलेली आहे. यासोबतच प्लाजमा रुग्णांना मिळावा यासाठी देखील प्रशासन सज्ज होऊ शकतो, असे मत जयसिंग विश्वकर्मा यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईच्या महत्त्वाच्या हॉस्पिटलमध्ये रोज रक्तसाठ्याचे प्रमाण

मुंबई अधिकृतरित्या रक्त संकलन करणाऱ्या जवळपास 55 ब्लड बँक आहेत. यामध्ये 15 ब्लड बँक या मोठ्या आणि सार्वजनिक रुग्णालयातल्या आहेत.

रुग्णालय

बाळासाहेब ठाकरे ब्लड बँक - ५० ते ५५ युनिट रोज रक्तसाठा

नायर हॉस्पिटल - ३५० ते ३६० युनिट रक्त साठा

कामा हॉस्पिटल ६० ते ६५ युनिट युनिट रक्त साठा

के ई एम हॉस्पिटल २५० ते २६० युनिट रक्त साठा

एल टी एम जी म्यूनसिपल हॉस्पिटल - ६५ ते ७० युनिट साठा

सेंट जॉर्ज हॉस्पिटल - ३० ते ३५ युनिट साठा

टाटा मेमोरियल हॉस्पिटल ५५० ते ५६० युनिट साठा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल - १०० ते १०५ युनिट साठा

जेजे हॉस्पिटल १०० ते १०५ युनिट साठा

के बी भाभा म्युंसिपल हॉस्पिटल १५ युनिट साठा

जी टी हॉस्पिटल - २० युनिट साठा

जगजीवन राम हॉस्पिटल १६५ ते १७५ युनिट साठा

वी एन देसाई हॉस्पिटल ५० ते ५४ युनिट साठा

कूपर हॉस्पिटल ३०० ते ३१० युनिट साठा

राजावाडी हॉस्पिटल १०० ते ११० युनिट साठा

याच रुग्णालयांबाबत विचार केल्यास २२०० ते २३०० युनिट रक्तसाठा आपल्याला पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त मुंबईत इतर मान्यताप्राप्त ब्लड बँकेत रक्तसाठा देखील आहे. तो मिळून जवळपास आज मितीला १५ हजार युनिट रक्त संकलन आहे. या सोबतच मुंबईत या आणि इतर हॉस्पिटलमधील आज मितिला ८०० च्या वर प्लाझमा युनिट उपलब्ध आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.