ETV Bharat / state

गंभीर.. मुंबईत कोविड सेंटरमधून दोन रुग्णांनी काढला पळ; सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू - corona patients escape mumbai

मुंबई पोलिसांच्या एसआरसीएफ पोलिसांनी या दोघांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. मात्र, या दोघांनाही पोलीस कोठडीत असताना कोरोनाची लागण झाली. यांनतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या दोघांची शिवाजी नगर येथील कोविड सेंटरमध्ये करण्यात आली होती.

corona patient escape
कोरोना रुग्ण फरार
author img

By

Published : Jul 17, 2020, 10:49 AM IST

मुंबई - कोविड सेंटरमधील दरवाजा तोडून दोन कोरोनाबाधित फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली. येथील शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. यानंतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथक तैनात करण्यात आली आहेत.

इरफान शकीर अली खान (१९) आणि संतोष मेहराज तिवरेकर (२०) अशी फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील इरफानवर बलात्काराचा आरोप आहे. तर संतोषवर मारहाण, गुंडगिरीसारखे अनेक गुन्हे दाखल दाखल आहेत. या दोन सराईत गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत.

मुंबई पोलिसांच्या एसआरसीएफ पोलिसांनी या दोघांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. मात्र, या दोघांनाही पोलीस कोठडीत असताना कोरोनाची लागण झाली. यांनतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या दोघांची शिवाजी नगर येथील कोविड सेंटरमध्ये करण्यात आली होती. तेथून या दोघांनी रुमचा दरवाजा तोडून १३ जुलैला पहाटे फरार झाले. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यांना कुठलेही लक्षणे नव्हती. शिवाजी नगर पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.