ETV Bharat / state

Mumbai Crime : इन्शुरन्स पॉलिसीबाबत आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी केली अटक

पॉलिसी धारकाला कॉल करून इन्शुरन्स पॉलिसी बाबत अधिक पैसे मिळवून देण्याचे आमीष दाखवून पैसे लुटणाऱ्या दोघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी ११ लाख १८ हजार ५५० रुपयांची फसवणूक केलेल्या सायबर चोरट्यांना पूर्व प्रादेशिक सायबर गुन्हे शाखेने सापळा रचून बेड्या ठोकल्या. आरोपींची नावे भरत सिंह सुरेंद्र सिंह रावत (वय 29 वर्षे) आणि कमल कुमार गिरी चंद्र पाल (वय 30 वर्षे) अशी आहेत.

Mumbai Crime
सायबर चोरांना अटक
author img

By

Published : Jan 15, 2023, 6:34 PM IST

मुंबई : भरत सिंह हा दिल्लीतील कलावल नगर येथे कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो. तर कमल कुमार हा दिल्लीत राहणारा असून इव्हेंट मॅनेजमेंटचा धंदा करतो. या गुन्ह्याचा तपास अधिकारी पोलीस निरीक्षक वैशाली श्रावगी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा माग काढला आहे. तक्रारदार यांना १५ जून २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२पर्यंत वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून अनोळखी आरोपींनी निहारीका कपुर, अलका विश्वास, अशोक महाजन, मनिष मल्होत्रा, राहुल जैन, राघव दयाल, संजय दिवाण व रोहित कुमार अशा वेगवेगळ्या नावांनी संपर्क साधून ते HDFC Life Insurance कार्यालयातून बोलत आहेत असे सांगितले. फिर्यादी यांच्या नावाची HDFC LIFE POLICY असल्याचे खोटे सांगून तिचा शेवटचा प्रिमियम २३ मार्च २०१५ रोजी भरलेला आहे असे सांगितले. या पॉलिसीची फन्ड रिलिज रक्कम 18 लाख 79 हजार मिळणार असल्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्याकरीता HDFC Lifeचे बनावट, अप्रुव्हल लेटर फिर्यादी यांच्या व्हॉट्ॲप वर पाठविले. त्यानंतर प्रोसेसिंग फी, ब्रोकरेज चार्जेस, टॅक्स चार्जेस व पॉलिसीची फन्ड रिलिज चार्जेसच्या नावाखाली त्यांची एकूण ११ लाख १८ हजार ५५० रुपयांनी फसवणूक केली.

मुद्देमाल जप्त : त्यानंतर फिर्यादी यांनी केलेल्या तक्रारीवरून पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात प्राप्त तपशीलाचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याच्या तपासकामी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाणेचे पोलीस पथक हे दिल्ली येथे रवाना झाले. त्यांनतर पोलीस पथकाने प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या विश्लेषणावरून या गुन्हयामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून विविध मोबाईल आणि विविध क्रमांकांचे सीम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी : यातील आरोपी हे पीडितांना मोबाईलव्दारे कॉल करून त्यांची पॉलीसी असल्याचे सांगून पॉलिसीची फन्ड रिलिज रक्कम मिळणार असल्याचे आमिष दाखवायचे. यासाठी लागणारी प्रोसेसिंग फी, ब्रोकरेज चार्जेस, टॅक्स चार्जेस व पॉलिसीची फन्ड रिलिज चार्जेसच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक करायचे.

मुंबई पोलिसांचे आवाहन : मुंबई पोलीस सर्वसामान्य जनतेस आवाहन करीत आहेत की, इन्श्युअरन्स पॉलीसी संबंधी आलेले संदेश, फोन यांना प्रतिसाद देवू नका. अधिक लाभांशाचे आमिष दाखविणाऱ्या अनोळखी व्यक्तींशी कोणत्याही प्रकारे व्यावहारिक संबंध प्रस्थापित करू नये. इन्श्युअरन्स पॉलीसी संबंधी काही समस्या असल्यास इन्श्युअरन्स कंपनीच्या रजिस्टर्ड ऑफिसमध्ये आपल्या नजिकच्या इन्श्युअरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन इन्श्युअरन्स कंपनीच्या अधिकृत एपव्दारे तक्रार करावी. गुगलच्या सर्च इंजिनवरील क्रमांक/ ईमेल आयडी विश्वासार्ह असतोच असे नाही. अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकवर क्लिक करू नये. कृपया इन्श्युअरन्स पॉलीसीची माहिती फोनव्दारे इतर व्यक्तीस देऊ नये.

हेही वाचा : UP Crime : मद्यधुंद पतीने गर्भवती पत्नीला दुचाकीला बांधून ओढत नेले, महिलेची प्रकृती चिंताजनक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.