ETV Bharat / state

Ravikant Tupkar: मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, रविकांत तुपकरांचा इशारा

Ravikant Tupkar: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारले आहेत. मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे.

Ravikant Tupkar warning
Ravikant Tupkar warning
author img

By

Published : Nov 24, 2022, 10:26 AM IST

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

चर्चेला तयार, पण सरकारकडून आमंत्रण नाही ? दरम्यान तुपकर यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. सरकारने तातडीने पावले उचलत मदतीची घोषणा केली. परंतु तुपकर यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले आहे. दरम्यान राज्य सरकारने याची दखल घेत वाशिम आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे.

मुंबईत दाखल होणार: सरकारने दोन्ही जिल्ह्यातील १५७ कोटींचा निधी मंजूर केला. पण हा निधी अपुरा असल्याचा दावा करत तुपकर यांनी आंदोलनावर कायम आहे. त्यांनी आज रायगड येथून मुंबईकडे यायला प्रस्थान केले आहे. खोपोली येथून वाशी मार्गे ते मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्याबरोबर शेकडो गाड्यांचा फौजफाटा व कार्यकर्ते उपस्थित आहेत. सरकार चर्चेला तयार नाही. जर सरकार चर्चेला तयार असेल तर आम्ही सुद्धा चर्चेला तयार आहोत, असे त्यांनी सांगितलं आहे. परंतु शिंदे- फडणवीस सरकारकडून त्यांना अद्यापही कुठल्याही पद्धतीने चर्चेला आमंत्रण न गेल्या कारणाने ते या आंदोलनावर ठाम आहेत.

काय आहेत मागण्या ? शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोरील पेच वाढला आहे. तसेच सोयाबीनला साडेबारा हजार तर कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी, अशी ही तुपकर यांची प्रमुख मागणी आहे.

पोलिसांनी बजावली नोटीस: आज शेकडो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय तुक्कर यांनी घेतला असल्याकारणाने या आंदोलनापूर्वीच त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण अशा एक नाही, हजारो नोटिसा दिल्या तरी त्याला आम्ही भिक घालत नाही, अशी भूमिका तुपकर यांनी मांडली असून असेही मरण आहे. तसही मरण आहे व त्यापेक्षा जलसमाधी घेऊन मेलेल बरं असे ते म्हणाले आहेत.

वाशी येथेच अडवण्यात येणार: अरबी समुद्रात असे आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा वाशीपासून मुंबईमध्ये तैनात करण्यात आला. तुपकर यांना वाशी येथेच अडवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तरीसुद्धा ते मुंबईत येण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, त्या अनुषंगाने मुंबईसुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.