ETV Bharat / state

Gold Theft Case: पोलिसच निघाले चोर, 2 कोटीच्या सोने चोरीप्रकरणी 3 आरोपींना अटक... - Gold Theft Case

सोन्याच्या चोरी प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात ( Arrested 3 in gold theft case ) आली आहे. त्यामध्ये 2 रेल्वे पोलीस हवालदारांचा समावेश आहे. पोलिसांनी 2 कोटी रुपयांचे सोनेही जप्त केले आहे. नितीन भुजिंग पाटील, रेल्वे पोलीस प्रभाकर युवराज नाटेकर आणि विकास भिमा पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Gold Theft Case
सोन्याच्या चोरी प्रकरणी 3 आरोपींना अटक
author img

By

Published : Dec 12, 2022, 5:49 PM IST

Updated : Dec 12, 2022, 8:49 PM IST

मुंबई : 2 कोटी 47 लाख 50 हजार किमतीचे सोने चोरणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी अटक ( 3 accused arrested in 2 crore gold theft case ) केली आहे. तसेच महत्वाचे म्हणजे आरोपींकडून संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी सोन्याच्या चोरीप्रकरणी 3 आरोपींना अटक केली, त्यात 2 रेल्वे पोलीस हवालदार यांचा देखील सहभाग असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपयुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली. आरोपी नोकर नितीन भुजिंग पाटील, रेल्वे पोलीस प्रभाकर युवराज नाटेकर आणि विकास भिमा पवार अशी अटक आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण: या गुन्हयातील फिर्यादी हे मँगलोर येथील सोन्याचे व्यापारी असून यांनी त्यांच्या नोकराजवळ मुंबईतील झवेरी बाझार येथे पोहविण्यासाठी ४.५ किलोग्रॅम सोने दिले होते. हा नोकर हा दिलेल्या वेळेत झवेरी बाझार येथे न पोहचल्याने वा त्याचेशी संपर्क होत नसल्याने फिर्यादी हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी नोकराने फिर्यादी यांना संपर्क साधून त्याचेकडील ४.५ किलोग्रॅम सोने चोरी झाल्याची माहिती दिली. त्यावरून फिर्यादी हे ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आले.

Gold Theft Case
आरोपींकडून जप्त केलेला मुद्देमाल

असे आले प्रकरण समोर: ट्रॉम्बे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र रणशेवरे यांनी तात्काळ या घटनेचे चौकशी केली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिल्या असता गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नानेकर आणि पथक पोलीस नाईक लेंभे, पोलीस शिपाई देशमुख, खुटाळे नोकराकडे विचारपूस तंत्राचा वापर करून सखोल चौकशी केली. दरम्यान, या नोकरानेच त्याचे दोन पोलीस साथीदारांच्या मदतीने संगनमत करून ४.५ किलोग्रॅम सोने चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून त्यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ४०८, १२० (ब) अन्वये तीन इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

Gold Theft Case
2 कोटीच्या सोने चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले आरोपी

आरोपी ताब्यात: ट्रॉम्बे पोलीसांनी तात्काळ तपास पथक तयार करून आरोपी नोकर नितीन भुजिंग पाटील, वय २८ वर्षे याला अटक करून त्याची चौकशी करून इतर दोन आरोपीतांचा शोध घेण्यास सुरवात केली. त्यावेळी गुन्हातील आरोपी प्रभाकर युवराज नाटेकर वय २९ वर्षे याचेकडे नमुद गुन्हयातील मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीचा तपासाद्वारे शोध घेवून त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून या गुन्हयातील चोरीची संपुर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली. नंतर यातील आरोपी विकास भिमा पवार याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेण्यात आले. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरीद खान करीत आहेत.

Last Updated : Dec 12, 2022, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.