ETV Bharat / state

भाजपच्या 'मेरा आंगण मेरा रणांगण'ला नेटिझन्सचे प्रत्युत्तर; '#महाराष्ट्रद्रोहीBJP' हॅशटॅग ट्रेंडमध्ये - भाजपा प्रदेश कार्यालय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्र सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र त्यांचे हे महाराष्ट्र बचावचे आंदोलन फेल गेले असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ आणि भाजपच्या निषेधार्थ नेटिझन्स यांनी दिलेले महाराष्ट्द्रोहीbjp हे प्रत्युत्तर सोशल मीडियावर तरी भाजपला चपराक असल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या 'मेरा आंगण मेरा रणांगणला' नेटिझन्सचे प्रत्युत्तर;

author img

By

Published : May 22, 2020, 7:46 PM IST

मुंबई - कोरोनाच्या भयानक संकटात भाजपला राजकारण सुचत आहे. काळे कपडे घालून त्यांनी महाराष्ट्र बचावचा नारा देत 'मेरा आंगन मेरा रणांगण' हे निषेध आंदोलन सुरू केले. मात्र, महाविकास आघाडीच्या समर्थनाथ आणि भाजपच्या विरोधात टिव्टरवॉर पेटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भाजपच्या आजच्या आंदोलना विरोध करण्यासाठी टिव्टरवरती आज दिवसभर #महाराष्ट्रद्रोहीbjp असा ट्रेंड सुरू आहे. या ट्विटर ट्रेंडवरू भाजपच्या #महाराष्ट्रबचावला कडाडून विरोध झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाजपच्या 'मेरा आंगण मेरा रणांगणला' नेटिझन्सचे प्रत्युत्तर; '#महाराष्ट्रद्रोहीBJP' हॅशटॅग ट्रेंडमध्ये

दिवसभरात भाजपच्या 'महाराष्ट्र बचाव' या ट्विटर ट्रेंडला 'महाराष्ट्रद्रोहीभाजप' या हॅशटॅगने ट्विट करून जवळपास १ लाखांहून अधिक नेटिझन्सने उत्तर दिले. त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्र बचाव या हॅशटॅगची हवाच निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोरोना विरूद्ध महाराष्ट्र विकास आघाडी सरकार लढत असताना देखील राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, अशी टीका महाराष्ट् द्रोहीbjp या हॅशटॅगच्या माध्यमातून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. काही वेळातच हा हॅशटॅग व्हायरल झाला. या माध्यमातूनही काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेच्या फॉलोअर्सनी एकी दाखवत हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये अव्वल स्थानी आणून ठेवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.