ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसरमध्ये 9 हजार 900 वृक्षांची लागवड

author img

By

Published : Jul 28, 2020, 11:46 AM IST

पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दहिसरमधील उद्यानात 9 हजार 900 वृक्षांची लागवड करण्यात आली. दहिसरच्या शहीद तुकाराम ओंबळे उद्यानापासून सकाळी साडे दहा वाजता वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली.

tree plantation
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसरमध्ये 9900 वृक्षांची लागवड

मुंबई - पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दहिसरमधील उद्यानात 9 हजार 900 वृक्षांची लागवड करण्यात आली. दहिसरच्या शहीद तुकाराम ओंबळे उद्यानापासून सकाळी साडेदहा वाजता वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली. 3 हजार 300 क्षेत्रफळात 9 हजार 900 वृक्षांची मियावाकी तंत्रज्ञानाने शहरी वर्गीकरण प्रकल्पाअंतर्गत लागवड करण्यात आली आहे.

दहिसरच्या प्रभाग क्रमांक 1 मधील पाच उद्यानात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात विविध प्रजातींच्या वृक्षांचा समावेश आहे. शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपणचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी विभाग प्रमुख व आमदार विलास पोतनिस, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.