ETV Bharat / state

धक्कादायक! कोरोना मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार, सायन रुग्णालयातील प्रकार - मुंबई कोरोना पेशंट

सायन रुग्णालयात कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाबाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उघडकीस आणला आहे. हा प्रकार लाजिरवाणा असल्याची टीका राणे यांनी केली आहे.

treatment-of-patients-on-the-side-of-deadbodies-in-sion-hospital

author img

By

Published : May 7, 2020, 8:31 AM IST

Updated : May 7, 2020, 9:11 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाबाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उघडकीस आणला आहे. हा प्रकार लाजिरवाणा असल्याची टीका राणे यांनी केली आहे.

  • In Sion hospital..patients r sleeping next to dead bodies!!!
    This is the extreme..what kind of administration is this!
    Very very shameful!! @mybmc pic.twitter.com/NZmuiUMfSW

    — nitesh rane (@NiteshNRane) May 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईमध्ये रोज शेकडो कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 10,527 वर तर मृतांचा आकडा 412 वर गेला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने पालिकेच्या रुग्णालयांची क्षमता संपली आहे. त्यातच मृतांचा आकडाही वाढत आहे. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांच्या बाजूलाच कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

असाच प्रकार आमदार नितेश राणे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आणला आहे. नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयातील एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एका वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह वॉर्डमध्ये खाटांवर आणि स्ट्रेचरवर प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले दिसत आहेत तर त्याच्या बाजूलाच इतर रुग्ण उपचारासाठी भरती असलेले दिसत आहे. हा प्रकार लाजिरवाणा असून रुग्णालय प्रशासन काय करते, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

Last Updated : May 7, 2020, 9:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.