मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही शब्द दिला होता. या राज्याचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल. त्याची वचनपूर्ती राज्यात झाल्यामुळे त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज (दि.23 जानेवारी) आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्या निमित्त हा जल्लोष राज्यभरात साजरा करत आहोत. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमातून आम्ही त्यांच्या आठवणींना उजाळा देणार असल्याचे शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - वांद्र्यात शिवसेनेच्या जल्लोषाची जोरदार तयारी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज 11 ज्येष्ठ शिवसैनिकांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्काराला राज्यभरातील कलावंत आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही परब यांनी सांगितले.
हेही वाचा - बनावट पेमेंट अॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या आरोपीला अटक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा ध्वज बदलून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापली आहे. त्या संदर्भात त्यांना विचारले असता, परिवहन मंत्री म्हणाले मी त्यांना केवळ शुभेच्छा देतो.
हेही वाचा - मनसेच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांसाठी मराठमोळ्या जेवणासोबत वडापावची सोय