मुंबई : गोवंडी परिसरात तक्रारदार तृतीयपंथी रात्री एक वाजताच्या सुमारास त्याच्या रफिक नगरमध्ये राहणाऱ्या मित्राला भेटण्यासाठी जात असताना फैजानसह त्याच्यातून साथीदारांनी त्यांची वाट रोखली आणि माराहाण (Assault on transgender) केली. तसेच त्यांचे कपडे फाडून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार (transgender sexually assaulted) केले. पीडित तृतीयपंथीला मदत करायला पुढे सरसावलेल्या तृतीय पंथीवरही धारदार शस्त्राने हल्ला (Assault on transgender with weapon) करण्यात आला. (Mumbai Crime )
पीडित रुग्णालयात दाखल : तृतीयपंथीने मदतीसाठी आरडाओरडा करताच तेथील आणखी एक तृतीयपंथी पुढे आला. परंतु आरोपींनी त्याच्याही डोक्यावर धारदार शस्त्राने प्रहार केला. त्यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस आणि घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तृतीयपंथींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून फैजानच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.