मुंबई - मालाडच्या मालवणी भागात मुंबईतील सर्वात मोठी तृतीयपंथी लोकांची वस्ती आहे. या तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, ओळख पटवण्यासाठी त्रास झाल्याची खंत तृतीयपंथींनी व्यक्त केली.
मालवणी परिसरात सुमारे एक हजारपेक्षा जास्त तृतीयपंथी राहतात. या भागातील 700 पेक्षा जास्त तृतीयपंथी अधिकृत मतदार आहेत. मतदान केंद्राबाहेर तृतीयपंथी कर्मचारी हवा होता, जेणेकरून आम्हाला ओळख पटवणे सोपे झाले असते, असे तृतीयपंथी मतदारांनी सांगितले.
१९९४ पासून देशातील तृतीयपंथीयांना मतदानाचा संविधानिक अधिकार मिळाला. मतदान करणे आपला हक्क आणि कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून तृतीयपंथी बांधव मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवत आहेत.