मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. असे असतानाच मागील आठवडाभरापूर्वी १५ आयएसअधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आज पुन्हा १३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
आज केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये व्ही.एस. मून, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा या पदावर भुवनेश्वरी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक जॉन्सन, सहायक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ या पदावर भाग्यश्री विसपुते यांच्या जागी करण्यात आली आहे.
एम. बी. वारभुवन यांची नियुक्ती सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई या रिक्त पदावर भाग्यश्री विसपुते सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा या पदावर, अमगोथू श्रीरंगा नायक, आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नागपूर यांची नियुक्ती सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
ए. जी. रामोड, अध्यक्ष जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती उस्मानाबाद यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे या रिक्त पदावर, तर बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा, यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे. शनमुगराजन एस, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा यांची नियुक्ती जिल्हाधिकारी वाशीम या पदावर, तसेच मनिषा खत्री, सदस्य सचिव विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची नियुक्ती महासंचालक वनामती, नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
दिलीप बी. हळदे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांची नियुक्ती संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे या पदावर, नवीन सोना, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई यांची नियुक्ती सदस्य-सचिव उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ मुंबई या रिक्त पदावर, एबी उन्हाळे, यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई या पदावर तर अश्विनी कुमार, भाप्रसे यांची नियुक्ती, व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ मुंबई या रिक्त पदावर एम. एन. केरकट्टा यांच्या जागी करण्यात आली आहे.