ETV Bharat / state

कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही - नरहरी झिरवाळ - नरहरी झिरवाळ बातमी

वणी येथील ट्रामा केअर सेंटर आता कोविड केअर सेंटर होणार आहे. याची पाहणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आरोग्य आढावा बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचे पाढे वाचत अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.

trama-care-center-at-wani-will-now-be-covid-care-center
कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही
author img

By

Published : Jul 20, 2020, 1:04 PM IST

दिंडोरी (नाशिक)- तालुक्यातील कसबे वणी येथील ग्रामीण रुग्णालयात वारंवार रुग्णसेवेबाबत जनतेच्या तक्रारी येत आहेत. कामचुकार अधिकाऱ्यांना जिल्हा शल्यचिकित्सक पाठिशी घालत असल्याची बाब गंभीर असून जिल्ह्य आरोग्य यंत्रणेवर आदिवासी जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार त्वरित थांबवावा. कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला.

कामचुकार कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही

वणी येथील ट्रामा केअर सेंटर आता कोविड केअर सेंटर होणार आहे. याची पाहणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आरोग्य आढावा बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचे पाढे वाचत अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.

काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांनी अचानक वणी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील अस्वच्छता तसेच अधिक्षक व काही कर्मचारी गैरहजर असल्याचा प्रकार समोर आला होता. यावर वैद्यकीय अधीक्षक रजेवर असल्याचे सांगितले होते. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सकांनी अधिक्षकांचा रजेचा अर्ज आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले होते.

कसबे वणीच्या ग्रामस्थांनी सर्व बेजबाबदार अधिकारी कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. एकीकडे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढ्यात योगदान देत कौतुकास्पद कामगिरी करत आहे. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रनेचे काम समाधानकारक असताना, शासन जिल्हा आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. वणी येथील तक्रारीवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. मात्र यापुढे कामचुकारपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा झिरवाळ यांनी दिला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, वैद्यकीय अधीक्षक, जिप सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच मनोज शर्मा, राजू गोतरने, शाम हिरे, डॉ.योगेश गोसावी, शरद महाले, केदू पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.