ETV Bharat / state

मुंबईकरांना पुन्हा पाहायला मिळणार कधीकाळी मुंबईची लाईफलाईन असलेल्या 'ट्राम'चे गतवैभव - लाईफलाईन

उन्हाळी सुट्टीत हा डबा मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे. बोरीबंदरच्या भाटिया उद्यानामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी तो ठेवण्यात येणार आहे. '‌ट्राम'चे दर्शन मुंबईकरांना व्हावे, यासाठी ट्रामचा डबा रबाळे येथील एन्थोनी गॅरेज येथे तयार करण्यात येत आहे.

कधीकाळी मुंबईची लाईफलाईन असलेल्या 'ट्राम'चे गतवैभव मिळणार पाहायला
author img

By

Published : Apr 5, 2019, 4:58 PM IST

मुंबई - कधीकाळी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी 'ट्राम बेस्ट बस' लोकल वाहतुकीच्या वेगात कमी पडू लागली. अखेर ३१ मार्च १९६४ साली ही बस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 'ट्राम' काही दिसली नाही. तिचे रूळही दडले गेले. जुन्या मुंबईची खरी ओळख असणाऱ्या या ट्रामबद्दल आजच्या पिढीला माहिती मिळावी यासाठी, बेस्ट आणि महागरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा मुंबईकरांना खऱ्या ट्रामचा डबा पाहता येणार आहे.

उन्हाळी सुट्टीत हा डबा मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे. बोरीबंदरच्या भाटिया उद्यानामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी तो ठेवण्यात येणार आहे. '‌ट्राम'चे दर्शन मुंबईकरांना व्हावे, यासाठी ट्रामचा डबा रबाळे येथील एन्थोनी गॅरेज येथे तयार करण्यात येत आहे. ट्रामचा सांगाडा जरी नवीन असला, तरी यात काही अवशेष हे जुन्याच ट्रामचे वापरण्यात आले आहेत.

दीड महिन्यापासून 'ट्राम'चा डबा तयार करण्याचे काम सुरू काम सुरू आहे. तो तयार करण्यासाठी बेस्टच्या अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. आता सुंदर अशा ट्रामचा डब्बा मुबंईकराच्या भेटीला लवकरच येणार आहे. 'ट्राम'मुळे एकेकाळी मुंबई जोडली गेली होती. मात्र, रस्ता कमी पडू लागला. सेकंदाप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांना ट्रामचा वेग कमी पडू लागला. मात्र, आता याच ट्रामची नव्याने ओळख होणार आहे. जुन्या आणि नविन ट्राम मध्ये कोणताही फरक नसावा, यासाठी पालिका आणि बेस्ट प्रशासनाने बरीच मेहनत घेतली आहे.

१९९३ साली तत्कालीन जनरल मॅनेजर मनमोहनसिह यांनी ट्रामचा डब्बा कोलकत्ता येथून आणला होता. मात्र, हा डब्बा पाऊस आणि उन्हाचा सामना न करू शकल्यामुळे तो खराब झाला. याच डब्याचे काही साहित्य नव्या ट्रामसाठी वापरण्यात आले आहे. सुरुवातीला ट्रामचे चित्र तयार केले. त्यानंतर रबाळे येथील एन्थोनी गॅरेजमध्ये ट्रामचा सांगाडा बनवून घेतला. ट्रामच्या डब्यात मेटल वापरण्यात आले आहे.
पर्यटकांना ट्रामबद्दल माहिती व्हावी, याकरिता माहिती फलकही लावण्यात येणार आहे. सुरुवातीला ट्रामचे ३१ रूट होते. एकूण ४३८ ट्राम तेव्हा सेवेत होत्या. ३१ मार्च १९६४ घोडीबंदर ते दादर टी टी रात्री १० वाजता शेवटची ट्राम धावली. बेस्टचे यतीन पिंपळे यांनी ही माहिती सांगितली आहे.

'ट्राम'चा प्रवास थोडक्यात -

  • - ९ मे १८७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली.
  • - सुरुवातीला ट्रामच्या टिकीटाचा दर हा तीन आणे होता.
  • - सुरुवातीला छापील तिकीट नव्हते.
  • - प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीटाचा दर दोन आणे झाला.
  • - त्यानंतर काही महिन्यांनी तिकिटे छापण्यात आली.
  • - १९०५ मध्ये बेस्ट म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्राम'वे कंपनीची स्थापना झाली.
  • - १९०७ साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद करण्यात आल्या.
  • - त्यानंतर मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली.
  • - १९२६ साली डबल डेकर ट्रामही शहरात आली.
  • - कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरू करण्यासाठी निर्णय घेतला.
  • -१५ जुलै १९२६ साली शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली.

Intro:मुंबई ।
कधीकाळी मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी ट्राम बेस्ट बस आणि लोकल वाहतुकीच्या वेगात कमी पडू लागली आणि 31 मार्च 1964 रोजी बंद करण्यात आली. त्यानंतर ट्राम काही दिसली नाही. तिचे रूळ ही दडले गेले. जुन्या मुंबईची खरी ओळख असणाऱ्या या ट्रामबद्दल आजच्या पिढीला माहिती मिळावी यासाठी बेस्ट आणि महागरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा मुंबईकरांना खऱ्या ट्रामचा डबा पाहता येणार आहे. ऐन उन्हाळी सुट्टीत हा डबा मुंबईकरांच्या भेटीला येणार आहे. बोरीबंदरच्या भाटिया उद्यानामध्ये नागरिकांना पाहण्यासाठी तो ठेवण्यात येणार आहे.Body:‌ट्रामचे दर्शन मुंबईकरांना व्हावे, यासाठी ट्रामचा डबा रबाळे येथील अंथॉनी गेरेज येथे तयार करण्यात येत आहे. ट्रामचा सांगडा जरी नवीन असला तरी यात काही अवशेष हे जुन्या ट्रामचे वापरण्यात आले आहेत. ही ट्राम ज्या रुळावर ठेवण्यात येणार आहे त्या रूळावरून कधीतरी ट्राम धावली होती. दीड महिन्यापासून ट्रामचा डबा तयार करण्याचे काम सुरू काम सुरू आहे. तो तयार करण्यासाठी बेस्टच्या अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. आता सूंदर अशा ट्रामचा मुबंईकराच्या भेटीला लवकरच येणार आहे. आजची युवापिढी ही मोबाईलमध्ये गुंतली आहे. या पिढीला ट्रामचा इतिहास कळाला पाहिजे. ट्रामने एकेकाळी मुंबई जोडली गेली होती. पण रस्ता कमी पडू लागला सेकंदाप्रमाणे धावणाऱ्या मुंबकराला ट्रामचा वेग कमी पडू लागला. ट्राम बंद पडू लागली. राहिल्या फक्त आठवणी. या आठवणी ताज्या करण्यासाठी पालिका आणि बेस्ट प्रशासनाने ट्रामचा एक डबा मुंबईकरांना दाखवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मध्ये लाईटीगश दोन्ही बाजूने फिरणारी सीट लावण्यात आली आहे. जुन्या आणि ट्राम मध्ये कोणताही फरक नसावा यासाठी सर्वानीच खूप मेहनत घेतली आहे.

1993 साली तत्कालीन जनरल मॅनेजर मनमोहनसिह यांनी ट्रामचा डबा कलकत्ता येथून आणला होता. पण हा पाऊस आणि उन्हाचा सामना न करू शकल्यामुळे तो खराब झाला. याच डब्याचे काही साहित्य नव्या ट्रामसाठी वापरण्यात आले आहे. नवीन ट्रामसाठी खूप मेहनत घेतली. सुरुवातीला चित्र तयार केले. ट्राम कशी हवी आहे यावर चर्चा देखील केली.यातील चाक आणि कंट्रोलर जुन्या ट्रामचे आहे.. रबाळे येथील ऐंथोनी गेरेजमध्ये ट्रामचा सांगडा बनवून घेतला. आतापूर्ण मेटल वापरण्यात येणार आले आहे. आता मुंबईकरांना ट्रामला सोबत सेल्फी घेता येणार आहे. तसेच येणाऱ्या पर्यटकाला या ट्रामची माहिती होण्यासाठी माहितीफलक ही लावण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सुरुवातीला 31 रूट हे ट्रामचे होते. एकूण 438 ट्राम तेव्हा सेवेत होत्या. 31 मार्च 1964 घोडीबंदर ते दादर टी टी रात्री 10 वाजता शेवटची ट्राम धावली. बेस्टचे यतीन पिंपळे यांनी सांगितलं.

ट्रामचा प्रवास थोडक्यात :
-९ मे 1874 रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली.
-सुरुवातीला तीन आणे तिकिट
-सुरुवातीला छापिल तिकीट नव्हते
- प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीट
दोन आणे झाले
-नंतर काही महिन्यानंतर तिकिटे छापली
१-९०५ मध्ये बेस्ट म्हणजेच बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्रामवे कंपनीची स्थापना
-1907 साली घोड्य़ांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम बंद
-मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली
-1926 साली डबलडेकर ट्रामही शहरात आली.
-कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरु करण्यासाठी निर्णय
-15 जुलै 1926 साली शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली.

नोट

मराठी आणि हिंदी 121 पाठवला आहे.

प्रमोद सरांनी नेशनलसाठी घेयाची आहे असे सांगितले आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.