मुंबई - पावसामुळे मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा धीम्या गतीने चालू आहे. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेचा नाला तुंबल्यामुळे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे.
मुंबईत शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे मुंबईतील सर्वच वाहतूक व्यवस्था विस्कळित झालेली पाहायला मिळत आहेत. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच पालिकेतर्फे व रेल्वे प्रशासनाकडून पाणी उपसा पंप लावण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे गटार, नाले तुंबलेले आहे. पाण्याच्या प्रवाहात प्लास्टिक वस्तू येत असल्याने पाण्याच्या प्रवाह थांबत आहे. त्यामुळे पाणी रेल्वे ट्रॅक वर जमा होत आहे.
कांजूरमार्ग रेल्वे स्थानक व विक्रोळी रेल्वे स्थानक येथील नाल्यातील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला. परिणामी काही वेळ रेल्वे वाहतूक धीम्या गतीने चालू होती. पावसाचा जोर कमी झाला असल्याने 20 ते 25 मिनिट उशिराने वाहतूक चालू आहे.