मुंबई: 6 डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त Mahaparinirvan Divas दादर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. Mumbai Traffic Police त्यामुळे चैत्यभूमी आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांच्या वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेता ५ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत वाहतूक व्यवस्थापनासाठी योग्य ते आदेश काढण्यात आले आहेत.
जनतेस पोहोचणारा धोका, अडथळा तसेच गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी आदेश जारी केले आहेत. 5 डिसेंबर सकाळी 6:00 वाजल्यापासून ते 7 डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत चैत्यभूमी शिवाजी पार्क दादर परिसराकडे जाणाऱ्या खालील रस्त्यांवरील वाहतुकीचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी काही मार्गाच्या निर्देशनामध्ये बदल करण्यात आले आहेत.
दिशा मार्ग आणि खालील मार्ग वाहतुकीसाठी बंद: १ स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदूजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीकरीता बंद राहिल. तथापी हिंदूजा हॉस्पिटल येथील स्थानिक नागरिक हे एस. बॅक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबडे चौक येथे जावू शकतील, एस. के. बोले रोड उत्तर वाहिनी सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग राहिल म्हणजेच सदर मार्गाच्या दक्षिण वाहिनीवरून पोतृगिज चर्च जंक्शन येथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शनकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहिल.
हे मार्ग वाहतुकीसाठी बंद: संपुर्ण रानडे रोड हा सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद राहिल. ज्ञानेश्वर मंदिर रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल. जांभेकर महाराज रोड हा सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद राहिल. संपुर्ण केळुस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर हा वाहतुकीकरीता बंद राहिल. संपुर्ण एम. बी. राऊत मार्ग हा वाहतुकीकरीता बंद राहिल. कटारीया मार्ग हा एल. जे. रोडच्या शोभा हॉटेल ते आसावरी जंक्शन पर्यंत वाहतुकीस बंद राहिल. सर्व प्रकारची जड वाहने, माल वाहतुक करणारी वाहने यांना स्वातंत्रवीर सावरकर मार्गाच्या माहिम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन पर्यत, एल. जे. रोडच्या माहिम जंक्शन ते गडकरी जंक्शनपर्यंत, गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धनमिल नाका पर्यत, सेनापती बापट मार्गाच्या माहिम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका पर्यंत आणि टिळक ब्रिज ते संपुर्ण एन. सी. केळकर रोड पर्यंत वाहतुकीकरीता बंद राहतील.
वाहतुकीची कोंडी झाल्यास पर्यायी मार्ग कोणते ? वाहतुकीचा मार्ग, दक्षिण वाहिनी पश्चिम द्रुतगती मार्गे माहिम एल जे रोड अथवा सेनापती बापट मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी, उत्तर वाहीनी कुलाबा कडून बि.ए. रोडने अथवा हाजी अली मार्गे अॅनी बेझेंट रोडने उत्तर वाहीनी वरून जाणाऱ्या वाहनांनी, महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शन कडून उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी. पूर्व द्वतगती महामार्गे दक्षिणेकडे जाणारी वाहतुक.
उपलब्ध पर्यायी मार्ग: कलानगर जंक्शन चेथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते साथन रेल्वे स्थानक किंवा ६० फुट रोड, कुंभारवाडामार्गे साथन रुग्णालय येथे उजवे वळण घेऊ शकतात. अथवा बांदा-वरळी सागरी उड्डाणपुलमार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे. पी. डीमेलो रोड, बॅरीस्टर नाथ पै रोड, जकेरीया बंदर रोड, आर ए. के. मार्ग थांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजस्वाली उजवे वळण घेवून पुढे साधन हॉस्पीटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे अथवा बांदा- वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे. डॉ. ई. मोजेस रोड, रस्वांग चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे. या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बीपीटी कॉलनी, पुर्व मुक्त द्रुतगती मार्गाचा वापर करावा.