ETV Bharat / state

घाटकोपरकडे जाणारी एकेरी वाहतूक बंद; एमएमआरडीएच्या ढिसाळपणाचा नागरिकांना फटका

author img

By

Published : Aug 19, 2019, 4:38 PM IST

एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे बाळासाहेब ठाकरे चौक ते जागृती नगर मेट्रो स्थानका पर्यंत या मार्गावर पूल उभे करण्याचे काम गेले सहा वर्ष रखडले गेले. हा पूल जुन्या मार्गावरून होणार असल्याने याचे काम त्वरित संपविणे गरजेचे होते.परंतु एमएमआरडीएने गेले अनेक वर्ष या कामाकडे दुर्लक्ष केले. आता अचानक एमएमआरडीएला जाग आली असून त्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे याचा फटका नागरिकांना बसणार आहे.

जागृतीनगर मेट्रो जवळील घाटकोपर कडे जाणारी एकेरी वाहतूक बंद

मुंबई- शहरातील वाहतूक कोंडीला वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच प्रशासन आणि वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचे वारंवार समोर आले आहे. यातच एमएमआरडीएने रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी जागृतीनगर मेट्रो जवळील घाटकोपरकडे जाणारी एकेरी वाहतूक नुकतीच बंद केली आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

घाटकोपर-अंधेरी जोड रस्त्यावर वाहतुकीची मोठी रहदारी असते. हा रस्ता पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते. ते काम एमएमआरडीएने सुरू केल्याने या मार्गावर असलेल्या जागृती नगर मेट्रो स्थानकाजवळ अजून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.

जागृतीनगर मेट्रो जवळील घाटकोपर कडे जाणारी एकेरी वाहतूक बंद

एमएमआरडीएने जुन्या घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर अचानकपणे घाटकोपरकडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. तसेच या मार्गावर फक्त अंधेरीकडे येणारी एकेरी वाहतूक सुरू रहाणार आहे. मात्र असे करताना एमएमआरडीएकडून कुठलीही पूर्व सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावर वाहतूक व्यवस्था ढिसाळणार असल्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या या ढिसाळपणावर आता या भागातील नागरिकांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

एमएमआरडीएच्या ढिसाळपणामुळे ही अवस्था

जागृती नगर मेट्रो स्थानक निर्माण झाल्यावर या रस्त्याचे दोन विभाजन झाले होते. एक रस्ता थेट श्रेयस सिग्नल वरून पूर्व द्रुतगती मार्गाला जाऊन मिळतो. तर जुना मार्ग पारशीवाडी, जागृती नगर, माणिकलाल इस्टेट मार्गे लाल बहादूर शास्त्री मार्गाला जावून मिळतो. एमएमआरडीएने जेव्हा मेट्रो सुरू झाली तेव्हाच या नव्या रस्त्याचे संपूर्ण काम करणे गरजेचे होते. मात्र एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे बाळासाहेब ठाकरे चौक ते जागृती नगर मेट्रो स्थानकापर्यंत या मार्गावर पूल उभे करण्याचे काम गेले सहा वर्ष रखडले गेले. हा पूल जुन्या मार्गावरून होणार असल्याने याचे काम त्वरित संपविणे गरजेचे होते. परंतु एमएमआरडीएने गेले अनेक वर्ष या कामाकडे दुर्लक्ष केले.

आता अचानक एमएमआरडीएला जाग आली असून त्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. हा मार्ग बंद केल्याने काजूटेकडी, पारशीवाडी, माणिकलाला इस्टेट, जागृती नगर अश्या मोठ्या लोकवस्तीला त्याचा फटका बसणार आहे. परिणामी राहिवाश्यांना काही मीटर अंतरासाठी दीड ते दोन किलोमीटर अंतर कापून यावे लागणार आहे.

Intro: जागृतीनगर मेट्रो जवळील रखडलेल्या रस्त्याचे काम चालू करण्याकरिता एमएमआरडीएने बॅरिकेट लावल्याने वाहतूक कोंडी.

मुंबई मधील वाहतूक कोंडीला वाहनांची वाढत्या संख्येबरोबरच प्रशासन आणि वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार हि मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यातच एमएमआरडीएने रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी जागृतीनगर मेट्रो जवळील घाटकोपर कडे जाणारी एकेरी वाहतूक नुकतीच बंद केली असल्याने याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहेBody: जागृतीनगर मेट्रो जवळील रखडलेल्या रस्त्याचे काम चालू करण्याकरिता एमएमआरडीएने बॅरिकेट लावल्याने वाहतूक कोंडी.

मुंबई मधील वाहतूक कोंडीला वाहनांची वाढत्या संख्येबरोबरच प्रशासन आणि वाहतूक विभागाचा ढिसाळ कारभार हि मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यातच एमएमआरडीएने रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी जागृतीनगर मेट्रो जवळील घाटकोपर कडे जाणारी एकेरी वाहतूक नुकतीच बंद केली असल्याने याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

घाटकोपर अंधेरी जोड रस्तावर मोठी वाहतुकीची रहदारी असलेल्या आणि पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर या अगोदरच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना आता. हि वाहतूक कोंडी जागृती नगर मेट्रो स्थानकजवळ दुप्पट होणार आहे. याचे कारण म्हणजे गेले 5 ते 6 वर्ष या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम एमएमआरडीए ने सुरु केले असून त्यासाठी जुन्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड वर अचानक पणे घाटकोपरकडे जाणारी वाहतूक बंद केली असून कोणतीही पूर्व सूचना न देता या मार्गावर फक्त अंधेरीकडे येणारी एकेरी वाहतूक सुरु रहाणार आहे. यामुळे या ठिकाणच्या रहिवाश्यानी संताप व्यक्त केला असून .जागृती नगर मेट्रो स्थानक निर्माण झाल्यावर या रस्त्याचे दोन विभाजन झाले. एक रस्ता थेट श्रेयस सिग्नल वरून पूर्व द्रुतगती मार्गाला ला जाऊन मिळतो. तर जुना मार्ग पारशीवाडी,जागृती नगर, माणिकलाल इस्टेट मार्गे लाल बहादूर शास्त्री मार्गाला जावून मिळतो. नव्या रस्त्याचे खरे तर एमएमआरडीए ने जेव्हा मेट्रो सुरु झाली तेव्हाच संपूर्ण काम पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु ढिसाळ नियोजनामुळे बाळासाहेब ठाकरे चौक ते जागृती नगर मेट्रो स्थानक पर्यंत या मार्गावर एक पूल उभा करण्याचे काम गेले सहा वर्ष रखडले गेले. हा पूल खरे तर जुन्या मार्गाच्या वरून होणार असल्याने याचे काम त्वरित सुरु करून संपविणे गरजेचे होते.परंतु एमएमआरडीएने गेले अनेक वर्ष या कामाकडे लक्षच दिले नाही. आता अचानक एमएमआरडीएला जाग आली असून त्यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. हा मार्ग बंद केल्याने काजूटेकडी, पारशीवाडी, माणिकलाला इस्टेट, जागृती नगर अश्या मोठ्या लोकवस्तीला याचा मोठा फटका बसणार आहे. राहिवाश्यांना काही मीटर अंतरासाठी दीड ते दोन किलोमीटर अंतर कापून यावे लागणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.