ETV Bharat / state

Sakal Hindu Samaj Morcha: दादर येथे आज सकल हिंदू समाज मोर्चा; 'हे' आहेत वाहतुकीत बदल - पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन

आज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सकल हिंदू समाज यांनी शिवाजी पार्क ते महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ, दादरपर्यंत मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यामुळे या मार्गावर निर्माण होणारी वाहतूक समस्या लक्षात घेवून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज होणारी गर्दी पाहता वाहतूकीचे नियमन करण्यासाठी योग्य ते आदेश पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी जारी केले आहे.

Sakal Hindu Samaj Morcha
सकल हिंदू समाज मोर्चा
author img

By

Published : Jan 29, 2023, 7:31 AM IST

मुंबई: या मोर्चाचा मार्ग हा राजा बडे चौक येथून गडकरी चौक, गोखले रोड, पोर्तुगिज चर्च चौक, जाखादेवी चौक, गोपीनाथ चव्हाण चौक, डावे वळण घेवून काकासाहेब गाडगीळ मार्गाने सेनापती बापट असा असेल. मार्गावरील ब्रिजच्या खालून सेनापती बापट मार्ग दक्षिण वाहिनी मार्ग, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ मैदान असा जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहन चालक आणि रहिवाशी यांना गैरसोय होवू नये. याकरीता गोर्चाच्या मार्गावरील व लगतच्या मार्गावरील वाहतुक ही मोर्चा सुरु झाल्यापासून ते मोर्चा संपेपर्यंत मोर्चाच्या मार्गक्रमणाप्रमाणे आवश्यकतेनुसार टप्याटप्याने बंद व सुरू करण्यात येणार आहे.

मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार वाहतूक: आज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार खालील नार्गावरील वाहतूकीचे नियमन व नियंत्रण करण्यात येणार आहे. एन. सी. केळकर रोड, राम गणेश गडकरी चौकापर्यंत गोर्चा सुरु झाल्यापासून मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार बंद आणि सुरु करण्यात येणार आहे. एन. सी. केळकर रोडला जोडणारे एम. बी. राऊत रोड आणि केळूस्कर रोड हे मोर्चा सुरु मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार बंद व सुरु करण्यात येणार आहे. गोखले रोड हा राम गणेश गडकरी चौक ते गोपीनाथ चव्हाण चौकापर्यंत मोर्चा सुरु झाल्यापासून मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार बंद व सुरू करण्यात येणार आहे.

वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद आणि सुरु: हनुमान मंदिर सर्कल येथून एस. के. बोले रोडने गोखले रोडवरील पोर्तुगिज चर्च जंक्शनकडे जाणारी वाहतुक ही गोखले रोडवरील मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार आवश्यकतेप्रमाणे बंद आणि सुरु करण्यात येणार आहे. हनुमान मंदिर सर्कल येथून कबूतरस्थाना मार्गे भवानी शंकर रोडने गोखले रोडवरील गोपीनाथ चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतुक ही गोखले रोडवरील मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार आवश्यकतेप्रमाणे बंद व सुरु करण्यात येणार आहे. जनतेस पोहचणारा धोका, अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरीता आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी निर्देश दिले आहेत.

मोर्चा कालावधीत वाहतूकीसाठी उपलब्ध पर्याची मार्ग: केळूस्कर रोड, एम. बी. राऊत रोड येथिल वाहन चालकांनी दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराकडे जाणेकरीता स्वातंत्रवीर सावरकर मार्गाचा वापर करावा. कोतवाल गार्डन कडून घेवून गोखले रोडचा वापर करुन दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी मोर्चाच्या मार्गक्रमणादरम्यान दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता कोतवाल गार्डन सर्कल ते गड़करीत चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोडने राजावडे चौक येथे डावे वळण घेवून स्वातंत्रवीर सावरकर मार्गाचा वापर करावा. एल. जे. रोडवरून येवून गोखले रोडचा वापर करुन दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी गोर्चाच्या मार्गक्रमणादरम्यान दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता एल. जे. रोडने शोभा हॉटेल जंक्शन येथे आलेनंतर उजवे वळण घेवून स्वातंत्रवीर सावरकर मार्गाचा वापर करावा. दादर टी टी सर्कल ते टिळक ब्रिज मार्गे एन. सी. केळकर रोड येथून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाचा वापर करावा.

वाहने उभी करण्यास प्रतिबंध: दक्षिण मुंबईकडून पूर्व उपनगरांकडे श्री सिध्दीविनायक मंदिर येथे उजवे वळण घेवून एस. के. बोले रोडने हनुमान मंदिर सर्कल दिशने जाणाऱ्या वाहन चालकांनी स्वातंत्रवीर सावरकर मार्गाचा वापर करुन एस बँक जंक्शन येथे उजवे वळण घेवून राजावडे चौक येथे एल. जे. रोडवर उजवे वळण घेवून गडकरी जंक्शन येथे डावे वळण घेवून कोतवाल गार्डन मार्ने टिळक ब्रिज मार्गे पूढे मार्गक्रमण करावे. एन. सी. केळकर रोड हा राम गणेश गडकरी चौक (सेनाभवन) पर्वत ૨ गोखले रोड हा राम गणेश गडकरी चौक (सेनाभवन) ते गोपीनाथ चव्हाण चौकपर्यंत, वाहने उभी करण्यास प्रतिबंध आहे. तसेच काकासाहेब गाडगीळ मार्ग हा गोपीनाथ चव्हाण चौक ते सेनापती बापट मार्गापर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध आहे.

हेही वाचा: CM KCR in Maharashtra : तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची महाराष्ट्रात एन्ट्री; ५ फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये संवाद मेळावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.