ETV Bharat / state

मुंबई पालिका मुख्यालयात सुरू होणार पर्यटन; न्याहाळता येणार इमारतीचे आतील सौदर्य

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी पालिका कामकाजाशी संबंधित अनेक बैठका पालिका मुख्यालयात घेतल्या आहेत. आदित्य ठाकरे यांना देखील मुख्यालयाच्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाने भुरळ घातली. पर्यटनमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यालयात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तश्या सूचना देखील पर्यटन विभागाला दिल्या आहेत.

पालिका मुख्यालय मुंबई
पालिका मुख्यालय मुंबई
author img

By

Published : Feb 12, 2020, 8:58 AM IST

मुंबई- भारतावर इंग्रजांचे राज्य असताना शहरात अनेक इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यापैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेच्या इमारतीमधील कलाकुसरीचा आनंद पर्यटकांना घेता यावा म्हणून पालिका मुख्यालयात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाला दिल्या आहेत. पर्यटन विभागाने यावर निर्णय घेतल्यानंतर पर्यटन सुरू होणार आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई महापालिका मुख्यालयाची इंग्रजी 'व्ही शेप' आकाराची ब्रिटिशकालीन इमारत आहे. १८९४ मध्ये ही इमारत बांधण्यात आली असून ती गॉथिक वास्तुकलेच्या शैलीचा उत्तम नमुना आहे. या इमारतीने शहराच्या वैभवात भर घातली असून ही इमारत शहराची ओळख बनली आहे. ही इमारत पाहण्यासाठी केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक येतात. पालिका मुख्यालयात कामकाज सुरू असल्याने पर्यटकांना इमारतीच्या आत जाऊन इमारतीचे सौंदर्य न्याहाळणे किवा छायाचित्रण करणे शक्य होत नाही. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पालिकेने उभारलेल्या सेल्फी पॉइंटवरूनच पर्यटकांना या इमारतीचे दर्शन घ्यावे लागते.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी पालिका कामकाजाशी संबंधित अनेक बैठका पालिका मुख्यालयात घेतल्या आहेत. आदित्य ठाकरे यांना देखील मुख्यालयाच्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाने भुरळ घातली. पर्यटनमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यालयात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून तश्या सूचना देखील पर्यटन विभागाला दिल्या आहेत. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पालिकेला सुट्टी असल्याने याच दिवशी पर्यटन सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन विभाग यावर विचार करीत असून लवकरच पर्यटन सुरू करण्यात येणार आहे.

पालिका मुख्यालयाचा इतिहास

सन १८६६ मध्ये मुंबई महापालिकेचे कार्यालय गिरगावमधील एका साध्यासुध्या इमारतीमध्ये होते. १८७० मध्ये ते एस्प्लनेड येथील एका इमारतीमध्ये हलविण्यात आले. २५ एप्रिल १८८९ या दिवशी पालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. विख्यात वास्तुविशारद एफ.डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी या इमारतीचे संकल्पचित्र तयार केले होते. गॉथिक शैलीतील ही इमारत वेळेत बांधणे हे एक आव्हान होते. तेव्हा थॉमस ब्लॅनी हे अध्यक्ष तर हॅरी अ‌ॅक्वर्थ आयुक्त होते. रावबहाद्दूर सीताराम खंडेराव हे बांधकाम खात्याचे निवासी अभियंता होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचे निकटवर्तीय व्यंकू बाळाजी यांनी या इमारतीच्या बांधकामाचे कंत्राट घेतले होते. इमारतीचा अंदाजित खर्च होता ११,८८,०८२ रुपये. प्रत्यक्षात ११,१९,९६९ रुपये इतकाच खर्च झाला. अंदाजित खर्चापेक्षा कमी खर्चात मुंबई महापालिकेची दिमाखदार इमारत १८९३ ला उभी राहिली आणि ती ही नियोजित वेळेपूर्वी. गॉथिक वास्तुकलेची रचना शैली तसेच सोनेरी बेसॉल्ट दगडाचा वापर करून या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. युनेस्कोने देखील २००५ साली इमारतीला जागतीक वारसा म्हणून जाहीर केले आहे.

हेही वाचा- 'कामाठीपुरा समूह पुनर्विकास' म्हाडाच्या माध्यमातून ; गृहनिर्माण मंत्र्यांकडून प्रस्ताव सादरीकरणाचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.