ETV Bharat / state

Top 10 @ 11 AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - Top 10 @ 9 AM

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Top 10 @ 11 AM
Top 10 @ 11 AM
author img

By

Published : Jul 16, 2021, 9:40 AM IST

Updated : Jul 16, 2021, 11:02 AM IST

  1. मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना तब्बल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या 75 वर्षांच्या होत्या. सविस्तर वृत्त -
  2. मुंबई - रात्री पासून जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तीन तासांत मुंबई शहरात 36 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 75 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, किंग सर्कल, सायन आदी सखल भागात पाणी साचले आहे. परिसरात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सविस्तर वृत्त -
  3. पुणे - सतत संशय घेणाऱ्या पतीचा लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून आणि गळा आवळून पत्नीने खून केला. त्यानंतर बाथरूममध्ये मृतदेह लटकावून आत्महत्येचा बनाव रचला. परंतु अंत्यसंस्कार करतेवेळी 13 वर्षीय मुलीच्या अश्रुंचा बांध फुटला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला. खडक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत पत्नीला अटक केली आहे. सविस्तर वृत्त -
  4. मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गेल्या दीड महिन्यात शरद पवार तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर गेले. त्यामुळे ठाकरे आणि पवार यांमध्ये दडलंय काय? अशी जोरदार चर्चेला उधाण आले आहे. सविस्तर वृत्त -
  5. मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी वाढल्याने आज ना उद्या सरकार पडेल, अशी भाजपची धारणा आहे. परंतु, भाजपला दुर्लक्षित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विरोधकांच्या भूमिकेत उभे केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सरकारवर एकीकडे तोफ डागायची तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून पांघरुन घालायचा, असा प्रकार सुरु आहे. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये नुरा कुस्ती सुरु असल्याचे बोलले जाते. सविस्तर वृत्त -
  6. श्रीनगर - जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पुन्हा अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक शुक्रवारी सकाळी झाली. यात आलमदार कॉलनी डेन्नर ईदगाह या भागात लपून बसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांना जवानांनी कंठस्नान घातला आहे. अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ट्विटकरुन दिली आहे. सविस्तर वृत्त -
  7. नवी दिल्ली - भारत अजूनही कोरोनाची दुसरी लाट अनुभवत आहे. ईशान्यकडील राज्यांसह दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाशी लढा सुरू असल्याचे सरकारी कोव्हिड तज्ज्ञांनी म्हटले आहे. सविस्तर वृत्त -
  8. विदिशा (मध्य प्रदेश) - जिल्ह्यातील गंजबासौदाच्या लाल पठार परिसरात घडलेल्या एका घटनेत ४० हून अधिक जण विहिरीत पडले. यात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जणांना वाचवण्यात आले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरू आहे. मृत्यूची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटद्वारे दिली. दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांच्या आदेशावरून राज्यमंत्री विश्वास सारंग घटनास्थळी उपस्थित आहेत. सविस्तर वृत्त -
  9. पुणे - माजी वनमंत्री संजय राठोड यांना ज्या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला त्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी पूजाच्या आईवडिलांचा जवाब नोंदवला आहे. ' पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात आमचे कोणावरही आरोप नाहीत, तिच्या मृत्यूनंतर याप्रकरणात राजकारण केले गेले. पूजाच्या मृत्यूनंतर जे काही घडले तो सर्व पॉलिटिकल ड्रामा होता ' असा जवाब पूजाच्या आईवडिलांनी नोंदवला असल्याची माहिती पोलीस खात्यातील सूत्रांनी दिली. वानवडी पोलीस ठाण्यात पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त -
  10. नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही वापरात येणाऱ्या देशद्रोह कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल विचारला आहे. सरकार विरोधात बोलणाऱ्यांवर पोलिसांकडून देशद्रोह कायद्याचा गैरवापर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. देशद्रोह कायदा हा वसातवादी असल्याटी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली. सविस्तर वृत्त -

Last Updated : Jul 16, 2021, 11:02 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.