- मुंबई : एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत सोमवारी चांगलाच गाजला. यावरील चर्चेला उत्तर देताना एमपीएससीची सर्व पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनात केली. वाचा सविस्तर...
- मुंबई - 'देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही. मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे. आम्ही काय भारत- पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात, बातचीत होत असते. मात्र राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. फडणवीस यांचे देखील हेच म्हणणे आहे. आपण पाहिले असेल अमीर खान आणि किरण राव यांचे रस्ते वेगळे झाले, मात्र मित्र कायम आहेत. सेम आमचे तसेच आहे. रस्ते वेगळे आहेत, मात्र मैत्री कायम आहे. आमची मैत्री कायम राहील. मात्र याचा अर्थ हा नाही की, आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत. परिस्थिती आत्ता काय आहे आणि उद्या काय असेल याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही. माझ्यापेक्षा जास्त माहिती फडणवीसांकडे असते. या क्षणी महाराष्ट्रात जे सरकार आम्ही बनवले आहे, ते उत्तम सुरू आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. वाचा सविस्तर...
- कोलकाता - बंगालमधील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते अभिजित मुखर्जी आज टीएमसीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अभिजीत आज संध्याकाळी टीएमसीत सामील होतील. वाचा सविस्तर...
- नवी दिल्ली - आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासात नवे 39,796 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 723 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 42,352 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख इतकी आहे. देशाचा रिकव्हरी रेट 97.11 टक्क्यांवर आला आहे. याचबरोबर भारताने लसीकरणात 35 कोटींची टप्पा पार केला आहे. वाचा सविस्तर...
- मुंबई - कोरोनामुळे पालक अडचणीत असले तरी दीड वर्षांपासून पालकांकडून शुल्क भरण्यात येत नसल्याने शाळाही अडचणीत आल्या आहेत. शाळा प्रशासनाचे आर्थिक गणित बिघडले असल्याने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना वेतन देणे, शाळेच्या जागेचे भाडे भरणे, वीज देयके भरणे, कर्जाचे हप्ते थकले आहेत. यासारख्या अनेक समस्या शाळा संचालकांनी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या (मेस्टा) बैठकीत मांडल्या. पालकांनी शुल्क भरली नाही तर शाळा चालवणे अशक्य असल्याचे मत अनेक शाळा संचालकांनी आक्रमकपणे मांडले. वाचा सविस्तर...
- मुंबई - चोरीला विरोध केल्यामुळे ज्वेलर्सच्या मालकाचा गोळी झाडून खून केल्याची घटना दहिसरमध्ये घडली. याप्रकरणी मुख्य सूत्रधार बंटी पाटीदार आणि त्याच्या एका साथीदारास मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी याच प्रकरणातील 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
- नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी (4 जुलै) हिंदुत्व आणि लिंचिंगसंदर्भात विधान केले. यावरून चर्चेला तोंड फुटले आहे. सोमवारी (5 जुलै) सकाळी ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन औवेसी, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी संरसंघचालकांच्या विधानावर भाष्य केले. 'हा द्वेष हिंदुत्वाची देण आहे. (लिंचिंग) हे गुन्हेगार हिंदुत्व सरकारच्याच आश्रयात आहेत, असे औवेसी यांनी म्हटलं ट्विट करत म्हटले आहे. वाचा सविस्तर...
- मुंबई - राज्यात पदोन्नती आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि मराठा आरक्षण, अशी आंदोलने केली जात आहेत. आता मुस्लीम समाजाने आमच्या ५ टक्के शैक्षणिक आरक्षणाचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला आहे. या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमीच्या वतीने आज (सोमवारी) मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चा होणारच, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...
- मुंबई - गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीसह गॅसची दरवाढ होत आहे. राज्यात देखील दरवाढ सुरूच आहे. आज डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, आज पुन्हा पेट्रोलचे दर वाढले आहेत. मुंबईत रविवारी पेट्रोलचे दर १०५.६३ रुपये होते. आज ३३ पैशांनी वाढ होऊन पेट्रोल १०५.९७ रुपये लिटरवर पोहोचलंय. तर, दिल्ली आणि मुंबई दोन्ही शहरांमध्ये सीएनजीचे दर अनुक्रमे ४३.४० रुपये आणि ४७.९५ रुपयांवर स्थिर आहेत.
- कोल्हापूर - जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध आजपासून (5 जुलै) हटविण्यात आले आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये ही शिथिलता देण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील इतर भागात मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. सोमवारपासून 9 जुलैपर्यंत हे निर्बंध हटविण्यात आले असल्याबाबतची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. आता अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकानं, आस्थापना 9 जुलैपर्यंत सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
Top 10 @ 1pm : दुपारी 1 पर्यंतच्या ठळक 10 बातम्या; वाचा एका क्लिकवर...
वाचा दुपारी 1 वाजेपर्यंतच्या ठळक 10 बातम्या, फक्त एका क्लिकवर...
top ten

Last Updated : Jul 5, 2021, 1:13 PM IST